काँग्रेसला जबर हादरा..! प्रदेशाध्यक्षांच्याच जिल्ह्यात भाजपचा सर्जिकल स्ट्राईक; दिग्गज नेत्यांचा रातोरात प्रवेश
Maharashtra Politics :

Maharashtra Politics : राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच ढवळून निघाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरही पक्षांतराची मालिका सुरूच असून आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यातील अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात भाजपचा झेंडा हाती घेतला. हा पक्षप्रवेश सोहळा रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार श्वेता महाले देखील उपस्थित होत्या.
या पक्षप्रवेशात माजी नगराध्यक्ष तथा चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदू सवडतकर, काँग्रेस नेते गुलाबराव सपकाळ, चिखली शहराध्यक्ष राहुल सवडतकर, पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद देशमुख, किसान काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद पालवे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अमोल काकडे, शेलोडीचे माजी सरपंच दिलीप नरवाडे, शिवव्याख्याते संतोष गवारे पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
चिखली (जि. बुलढाणा) येथील कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपा परिवारात प्रवेश!
📍पक्ष प्रवेश करणारे मान्यवर-
माजी नगराध्यक्ष तथा चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदू सवडतकर, कॉंग्रेसचे नेते गुलाबराव सपकाळ, कॉंग्रेसचे चिखली शहराध्यक्ष राहुल सवडतकर,… pic.twitter.com/pBFlUqyG0J— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) March 6, 2026
प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात काँग्रेसची चिंता वाढली
महत्त्वाची बाब म्हणजे बुलढाणा हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा गृहजिल्हा आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या जिल्ह्यातच काँग्रेसचे नेते मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने पक्षाची चिंता वाढली आहे.
स्थानिक निवडणुकांतही काँग्रेसची खराब कामगिरी
अलिकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षाला मोजक्याच ठिकाणी विजय मिळाला होता. निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.





