Harshada Deshmukh : मोठी बातमी! पुणे पदवीधरसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर; कोण आहेत हर्षदा देशमुख-जाधव?
Harshada Deshmukh : महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख-जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Harshada Deshmukh : पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सुरू असलेल्या जागावाटपावर जोरदार रस्सीखेच झाल्याचे बघायला मिळाले. अखेर भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली.
मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही दावा केला होता. त्यानुसार शिंदेसेनेकडून मंगेश चिवटे यांना एबी फॉर्म देण्यात आला असून, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सचिन सानप यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख-जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला असून, त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Harshada Deshmukh)
विशेष म्हणजे पुणे पदवीधर मतदारसंघात यंदा दोन ‘जाधव’ आमनेसामने येणार आहेत. भाजपकडून डॉ. स्मिता जाधव, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षदा देशमुख-जाधव यांना उमेदवारी मिळाल्याने या लढतीची रंगत वाढली आहे.
कोण आहेत हर्षदा देशमुख-जाधव? (Harshada Deshmukh)
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर; कोण आहेत हर्षदा देशमुख-जाधव?
हर्षदा देशमुख-जाधव या माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
हर्षदा देशमुख-जाधव या शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत त्यांनी काम केले आहे. तसेच क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. आता पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या प्रथमच राजकीय मैदानात उतरल्या आहेत.
Rohit Pawar: “भीमनवारांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, पण…”; रोहित पवारांचा मोठा दावा





