Eknath Shinde : मोठी बातमी! एकनाथ शिंदे सहा खासदारांसोबत PM मोदींची भेट घेणार; दिल्लीतील घडामोडींकडे राज्याचे लक्ष
Eknath Shinde : अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटी घेणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

Eknath Shinde to meet Prime Minister Narendra Modi :सध्या दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात शिवसेना चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. शिवसेना कुणाची याचा अंतिम फैसला काय लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. ही सुनावणी निर्णायक टप्प्यावर असताना घडामोडींना वेग आला आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटी घेणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. (Eknath Shinde)
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊ वाजता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे ठाकरे गटातून फुटून बाहेर पडलेल्या सहा खासदारांसोबत मोदींच्या भेटीला जाणार असल्याचे समजते. या भेटीकडे अनेकांचे लक्ष लागले असून नेमकी काय चर्चा होणार याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. (Eknath Shinde)
निर्णायक टप्प्यावर भेट (Eknath Shinde)
गेल्या दोन दिवसांत ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल ठाकरे गटाच्या बाजूने न्यायालयात जोरदार युक्तीवाद करताना दिसत आहेत. विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यावर त्यांच्याकडून भर देत युक्तिवाद केला जात असून, यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह ठाकरे गटाला मिळू शकते अशी आशा पल्लवीत झाली आहे. मात्र, न्यायालय या निर्णायक टप्प्यावर निकाल देणार की पुन्हा सुनावणी लांबणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
काय चर्चा होऊ शकते? (Eknath Shinde)
- उभय नेत्यांमध्ये या विषयावर स्वतंत्रपणे चर्चा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
- जेन झी’ (Gen Z) च्या आंदोलनानंतर देशभरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी एनडीएच्या (NDA) घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. या भेटीत या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- पंतप्रधान मोदी एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
- शिवसेना खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.





