Asaduddin Owaisi: न्यायाधीश समजून पोलिसांनी ओवेसींनाच दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’; सहारनपूरमधील प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल
Asaduddin Owaisi: उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये पोलिसांच्या एका मोठ्या गोंधळाचा प्रकार समोर आला आहे.

Asaduddin Owaisi: उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये पोलिसांच्या एका मोठ्या गोंधळाचा प्रकार समोर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांच्या स्वागतासाठी राखीव ठेवण्यात आलेला ‘गार्ड ऑफ ऑनर’ पोलिसांनी चक्क खासदार असदुद्दीन ओवेसी यांनाच दिला.
शनिवारी घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्रशासकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमका प्रकार काय? Asaduddin Owaisi:
समोर आलेल्या माहितीनुसार, सहारनपूर येथील सर्किट हाऊसमध्ये शनिवारी सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. यावेळी संबंधित न्यायाधीशांना पोलिसांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्याचे नियोजन होते. त्यासाठी पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले होते.
मात्र, शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास न्यायाधीशांच्या आगमनाऐवजी खासदार असदुद्दीन ओवेसी यांची गाडी सर्किट हाऊसमध्ये दाखल झाली. ओवेसी यांच्यासोबत मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी असल्याने पोलिसांचा गोंधळ उडाला. त्यांनी ओवेसी यांनाच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश समजून त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला.
सहारनपुर में सुप्रीम कोर्ट के जज के स्वागत के लिए तैयार पुलिसकर्मियों ने कथित तौर पर गलती से AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी को गार्ड ऑफ ऑनर दे दिया https://t.co/IYlwQXRWZs
— Anjali Kumari (@AnjaliKumari009) November 21, 2026
ओवेसींनीही स्वीकारली पोलिसांची सलामी! Asaduddin Owaisi:
या अनपेक्षित प्रकारावेळी असदुद्दीन ओवेसी आपल्या सुरक्षा रक्षकांसह सर्किट हाऊसमध्ये पोहोचले होते. पोलिसांनी सलामी देण्यास सुरुवात करताच ओवेसी काही क्षण थांबले आणि त्यांनी ती सलामी स्वीकारली. मात्र, हा गार्ड ऑफ ऑनर प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी राखीव होता.
पोलिसांच्या या प्रोटोकॉलमधील चुकीमुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, पोलिसांच्या गोंधळावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.





