Arvind Kejriwal big setback: अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का ; राज्यसभा अध्यक्षांकडून ‘आप’च्या सर्व बंडखोर खासदारांना मान्यता
Arvind Kejriwal big setback: अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेने राघव चड्ढा यांच्यासह 'आप'च्या सर्व बंडखोर खासदारांना भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून मान्यता दिली आहे.

Arvind Kejriwal big setback: अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेने राघव चड्ढा यांच्यासह ‘आप’च्या सर्व बंडखोर खासदारांना भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून मान्यता दिली आहे. राज्यसभा सचिवालयाने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे.
राज्यसभा सचिवालयाने आम आदमी पक्षातून भाजपमध्ये सामील झालेल्या सर्व खासदारांबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. त्यांना भाजपचा भाग म्हणून घोषित करण्यात आले आहे, त्यामुळे राज्यसभेतील भाजप सदस्यांची संख्या ११३ झाली आहे.
‘आप’ने उपराष्ट्रपतींना पत्र लिहिले Arvind Kejriwal big setback:
रविवारी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र लिहून ‘आप’ सोडलेल्या सात खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.
त्या पत्रात त्यांनी,”हे खासदार आम आदमी पक्षाच्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून आले होते, परंतु नंतर त्यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील होण्याचा निर्णय घेतला.”असे म्हटले होते.
तर दुसरीकडे संजय सिंह यांनी, ‘आप’च्या सात खासदारांची ही कृती म्हणजे पक्षांतर आहे. हा पंजाबच्या जनतेचा आणि भारतीय संविधानाचा विश्वासघात आहे. त्यांनी सांगितले की, गरज पडल्यास आम आदमी पक्ष कायदेशीर कारवाई करेल.” असे म्हटले आहे.
राघव चड्ढांसह सात खासदारांचा ‘आप’ ला रामराम Arvind Kejriwal big setback:
राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केली. हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम साहनी आणि राजिंदर गुप्ता हे देखील त्यांच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला. पक्ष सोडलेल्या सातपैकी सहा जण पंजाबमधील राज्यसभेचे सदस्य आहेत.
या खासदारांनी असा आरोप केला की, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आपल्या तत्त्वांपासून आणि नैतिक मूल्यांपासून भरकटला आहे. चड्ढा म्हणाले, “घटनेनुसार, पक्षाचे दोन-तृतीयांश खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात.”






