Akshay Kumar : ॲक्शन हिरोचा रिअल लाइफ थरार… खिलाडी कुमार मृत्यूच्या दाढेतून तीनदा बचावला! स्वत: केला खुलासा
Akshay Kumar : बॅालिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार त्याच्या भूत बंगला चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने मोठा खुलासा केला आहे.

Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हॉरर-कॉमेडी प्रकारातील हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतानाच अक्षयने त्याच्या करिअरमधील थरारक अनुभव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेअर केला आहे.
शुभंकर मिश्रा याच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अक्षय कुमारने खुलासा की, चित्रपटांमध्ये स्टंट करताना तो तीन वेळा मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावला आहे.
खरंतर सुरुवातीच्या काळात अक्षय कुमार याची ओळख ॲक्शन हिरो म्हणून होती, आताही आहे. त्याचे अनेक चित्रपट अॅक्शनला अधिक महत्व देणार असून यामुळेच तर त्याला खिलाडी कुमार म्हटले जाते.
अपघाताविषयी बोलताना त्याने तीन चित्रपटांच्या सेटवर नेमकं काय घडलं याविषयी सांगितले. ‘सैनिक’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पहिला प्रसंग घडला. एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारताना त्याचा हात थकला होता आणि मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
दुसरा प्रसंग ‘इंटरनॅशनल खिलाडी’च्या वेळी घडला. एका सीनमध्ये कॅटामरान बोटीखालून जाण्याचा सीन करताना त्याचा थोडाही नेम चुकला असता, तर गंभीर अपघात होऊ शकला असता.
तिसरा अपघात ‘खिलाडी 786’च्या शूटिंगदरम्यान घडला असता. ज्यामध्ये उडी मारून हॉट एअर बलूनमध्ये लँड करताना तो धोक्यात आला होता. मात्र तिन्ही वेळाला तो मृत्यूच्या दाढेतून अक्षय कुमार बचावला.
दरम्यान, त्याची पत्नी ट्विंकल त्याला असे स्टंट करण्यापासून रोखते का, असा प्रश्न त्याला विचारल्यावर अक्षयने सांगितले की तिला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याची तिला सवय झाली असल्याचे अक्षयने सांगितले.
अक्षय कुमारच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे तो चर्चेत असून, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद चित्रपटाला मिळताना दिसत आहे. या चित्रपटातून दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबत 14 वर्षांनंतर अक्षय कुमार काम करत आहे. या चित्रपटात राजपाल यादव, वामिका गब्बी, असरानी, तब्बू आणि परेश रावण या कलाकारांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा : Deepika Padukone Good news : गुड न्यूज ! रणवीर सिंग आणि दीपिका दुसऱ्यांदा होणार आई-बाबा





