saamana-editorial : सर्व ‘खाणारे’ खाऊबाज लोक भाजपमध्ये सामील होतात. त्यामुळे….; ‘सामना’तून जहरी टीका; ‘वॉशिंग मशीन’ला…
saamana-editorial : आज 'सामना'च्या अग्रलेखातून सुवेंदू अधिकारी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

saamana-editorial : पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू पर्वाची सुरुवात झाली आहे. भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी काल ९ मे या दिवशी पश्चिम बंगाल राज्याची मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्याला 20 राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावली होती. याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपमधील अनेक बडे नेते उपस्थित होते.
यानंतर आज ‘सामना’च्या अग्रलेखातून सुवेंदू अधिकारी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपने ज्या सुवेंदू अधिकारी यांना प. बंगालच्या मुख्यमंत्रीपदी नेमल्याचे जाहीर केले आहे ते सुवेंदू अधिकारी आधी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्येच होते व मंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी उघडपणे लाच स्वीकारत असल्याचा व्हिडीओ तेव्हा भाजपने प्रसारित केला होता. तेच सुवेंदू अधिकारी पुढे भाजपमध्ये आले, पवित्र झाले आणि आता प. बंगालचे मुख्यमंत्री बनले.
यासोबतच चीनमधील एका घटनेचा उल्लेख करत, ‘हिंदू-मुसलमानां’सारखे विषय निर्माण करायचे व मूळ मुद्द्यावरचे लक्ष उडवायचे हे उद्योग भारताच्या भविष्याला घातक आहेत. चीनने दोन माजी संरक्षण मंत्र्यांना फाशी दिली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ‘वॉशिंग मशीन’ला फासावर लटकवले तरी चालेल! असे म्हटले आहे.
भारताला खरोखरच ‘विश्वगुरू’ किंवा ‘विकसित भारत’ बनवायचे असेल तर प्रथम भ्रष्टाचाऱ्यांची वॉशिंग मशीन बंद करा. चीनसारखे राष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन करून ‘सुपर पॉवर’ होत आहे. भारत मात्र भ्रष्टाचाराच्या दलदलीत बुडत आहे. भ्रष्टाचार हाच राष्ट्राचा खरा शत्रू आहे, असे मत मांडले आहे.
भारतात भ्रष्टाचार रोखण्यासाठी व भ्रष्टाचाऱ्यांना शासन करण्यासाठी अनेक कायदे आहेत. ‘न खाऊंगा न खाने दूंगा’सारख्या राष्ट्रीय घोषणा पंतप्रधानांकडून केल्या जातात, पण सर्व ‘खाणारे’ खाऊबाज लोक भाजपमध्ये सामील होतात. त्यामुळे भ्रष्टाचार काही थांबत नसतो. भारतात सार्वजनिक संपत्तीचा अपहार करणारे, बँकांची कर्जे बुडवणारे उद्योगपती तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या व्यवहारात राजकीय आश्रय तर मिळतोच, शिवाय पद्मश्री, पद्मविभूषण अशा पदव्यांनी सन्मानित केले जाते. ही बाब सगळ्यांसाठीच लाजिरवाणी आहे, असेही म्हटले आहे.
चीनमधील घटना काय?
चीनमधून एक बातमी आली ती महत्त्वाची वाटते. चीनचे दोन माजी संरक्षणमंत्री वेई फेंगे आणि ली शांगफु यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुरुवारी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. चिनी सैन्य न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली. फेंगे यांना लाचखोरीसाठी दोषी ठरवण्यात आले, तर शांगफु यांना लाच घेणे व देणे या दोन्ही आरोपांखाली दोषी मानण्यात आले. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून या दोन्ही नेत्यांना 2014 साली कम्युनिस्ट पक्षातून काढून टाकण्यात आले होते. हे दोघेही पक्षात व सरकारात अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम करीत होते. चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अत्यंत जवळचे म्हणून ते परिचित होते, पण भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येताच दोघांना अटक झाली. सैन्य न्यायालयात खटला चालवला गेला आणि आता फाशीची शिक्षा सुनावली गेली. चीनसारखे राष्ट्र भ्रष्टाचाऱ्यांच्या बाबतीत किती कठोर आहे ते दिसते. अशा लोकांना तेथे दयामाया नाही. पुन्हा स्वतः खायचे सोडा, पण ‘न खाने दूंगा’ याच भूमिकेवर ते ठाम असतात.
पश्चिम बंगालविषयी
नुकत्याच प. बंगालात विधानसभा निवडणुका पार पडल्या. तेथे ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. ममता बॅनर्जी यांचे सरकार कसे भ्रष्ट आहे ते भाजपचे नेते प्रचारात सांगत होते. मात्र आता भाजपने ज्या सुवेंदू अधिकारी यांना प. बंगालच्या मुख्यमंत्रीपदी नेमल्याचे जाहीर केले आहे ते सुवेंदू अधिकारी आधी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्येच होते व मंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी उघडपणे लाच स्वीकारत असल्याचा व्हिडीओ तेव्हा भाजपने प्रसारित केला होता. तेच सुवेंदू अधिकारी पुढे भाजपमध्ये आले, पवित्र झाले आणि आता प. बंगालचे मुख्यमंत्री बनले आहेत. हा भाजपचा भ्रष्टाचारविरोधाचा लढा आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर अनेक राज्यांतील ‘भ्रष्ट’ कंपूंना भाजपने स्वपक्षात घेतले. महाराष्ट्रात तर याबाबतीत कहर केला. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ज्यांच्या ‘ईडी’ चौकशा सुरू होत्या अशा मंत्र्यांना, आमदारांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष पह्डले गेले व त्या भ्रष्ट आमदारांच्या मदतीने महाराष्ट्रात भाजपने सरकार निर्माण केले.
मूळ मुद्द्यावरचे लक्ष उडवायचे हे…
भारताला खरोखरच ‘विश्वगुरू’ किंवा ‘विकसित भारत’ बनवायचे असेल तर प्रथम भ्रष्टाचाऱ्यांची वॉशिंग मशीन बंद करा. चीनसारखे राष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन करून ‘सुपर पॉवर’ होत आहे. भारत मात्र भ्रष्टाचाराच्या दलदलीत बुडत आहे. भ्रष्टाचार हाच राष्ट्राचा खरा शत्रू आहे. अशा शत्रूंचा गोतावळा जमा करून सत्ता भोगणाऱ्यांना राष्ट्रप्रेमावर प्रवचने देता येणार नाहीत. एखादा भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आला की, ‘लव्ह जिहाद’, ‘हिंदू-मुसलमानां’सारखे विषय निर्माण करायचे व मूळ मुद्द्यावरचे लक्ष उडवायचे हे उद्योग भारताच्या भविष्याला घातक आहेत.
हेही वाचा : Tamil Nadu : पारंपारिक साडी अन् केसात गजरा…; विजय थलापतीच्या शपथविधी सोहळ्यात पोहचली त्रिशा





