Tamil Nadu : पारंपारिक साडी अन् केसात गजरा…; विजय थलापतीच्या शपथविधी सोहळ्यात पोहचली त्रिशा
Tamil Nadu : विजय आणि त्रिशा ही तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकी ऑन-स्क्रीन जोडी मानली जाते.

Tamil Nadu : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापती तामिळनाडूचे मुख्यमंत्री होणार आहेत. ‘तमिळगा वेत्री कझगम’ (TVK) प्रमुख सी. जोसेफ विजय रविवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
२३४ सदस्यांच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे पत्र सादर केल्यानंतर, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना अधिकृतपणे सरकार स्थापनेसाठी पाचारण केले. दरम्यान, विजय यांची खास मैत्रीण आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन देखील शपथविधी सोहळ्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
‘एएनआय’ने (ANI) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्रिशा कृष्णन तिच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी तिने पारंपारिक साडी परिधान केली असून केसांत गजरा माळला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते खूप उत्सुक झाले असून ती विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.
#WATCH | Tamil Nadu: Actor Trisha Krishnan at the Jawaharlal Nehru Stadium in Chennai, where TVK Chief C Joseph Vijay will take oath as the Chief Minister of Tamil Nadu, shortly. pic.twitter.com/oCevs6N1Wx
— ANI (@ANI) May 10, 2026
विजय आणि त्रिशाची मैत्री
विजय आणि त्रिशा कृष्णन यांची मैत्री खूप जुनी आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. विजय आणि त्रिशा ही तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकी ऑन-स्क्रीन जोडी मानली जाते. दरम्यानच्या काळात असाही एक काळ आला होता, जेव्हा सुमारे १५ वर्षे दोघेही कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत.
त्यानंतर २०२३ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा एकत्र चित्रपट केला. तसेच, अलीकडेच एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दोघे एकत्र दिसले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
२७ वर्षांचा संसार मोडण्याच्या वाटेवर
दुसरीकडे, विजय यांची पत्नी संगीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. २७ वर्षांच्या संसारात आलेल्या या दुराव्यामुळे हा विषय अधिक चर्चेत आला. संगीताने विजयवर विवाहबाह्य संबंधांचे आरोपही केले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ती नाते सुधारण्याचा प्रयत्न करत होती, मात्र त्यात यश आले नाही, असे तिचे म्हणणे आहे. या दोघांचे लग्न १९९९ मध्ये झाले होते आणि त्यांना जेसन संजय हा मुलगा आणि दिव्या साशा ही मुलगी अशी दोन मुले आहेत.
हेही वाचा:





