Ajay Rai: पंतप्रधानांविषयी वादग्रस्त वक्तव्यानंतर अजय राय अडचणीत ;आता वाराणसीतही गुन्हा दाखल
Ajay Rai: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये त्यांचा ताफा जात असताना ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करताना दिसत आहेत.

Ajay Rai: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये त्यांचा ताफा जात असताना ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करताना दिसत आहेत.
अजय राय यांचा हा व्हिडीओ व्हिडिओ एआय-निर्मित असून मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी तो प्रसारित केला जात असल्याचा दावा त्यांनी केला असला तरी, आता त्यांच्यावर विविध जिल्ह्यांमध्ये कारवाई होताना दिसत आहे. त्यातच वाराणसीमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
वाराणसी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल Ajay Rai:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते अजय राय यांच्याविरोधात वाराणसी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाराणसीतील एका भाजप नेत्याच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे राष्ट्रीय भावना दुखावल्या गेल्याचा दावा त्यांनी केला आहे.
त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी, याच प्रकरणी महोबा येथे अजय राय आणि दोन डझनांहून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एआय-निर्मित व्हिडिओ प्रसारित Ajay Rai:
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी एबीपी लाईव्हशी बोलताना सांगितले की, हा एक एआय-निर्मित व्हिडिओ आहे. त्यांनी महोबा येथे बलात्कार पीडितेची भेट घेतली होती. बलात्कार पीडितेला न्याय देण्याऐवजी, या विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा व्हिडिओ प्रसारित केला जात आहे.






