Pushkar Shrotri father: अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या वडीलांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Pushkar Shrotri father : सुधाकर श्रोत्री हे अखेरपर्यंत ‘पार्लेकर कायस्थ’ या त्रैमासिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते.

Pushkar Shrotri father : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुष्कर श्रोत्री याचे वडिल सुधाकर श्रोत्री यांचे विलेपार्ले येथील निवासस्थानी रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. सुधाकर श्रोत्री हे वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व होते. ते 89 वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात तुषार श्रोत्री, पुष्कर श्रोत्री आणि केतन श्रोत्री हे पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सुधाकर श्रोत्री यांच्या निधनाने साहित्य, सामाजिक आणि वृत्तपत्र वितरण क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज (सोमवार, 2 मार्च) सकाळी 8 वाजताच्या सुमारास मुंबईत विलेपार्ले इथल्या पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, एका नामांकित वृत्त समूहात त्यांनी तब्बल 65 वर्षे वृत्तपत्र वितरण व्यवस्थेत मोलाचं योगदान दिलं.
त्यासोबतच त्यांना साहित्याची प्रचंड आवड होती. त्यांनी अनेक कविताही लिहिल्या आहेत. श्रोत्री यांनावृत्तपत्र क्षेत्रातील कामाबरोबरच साहित्याचीही विशेष आवड होती. त्यांनी अनेक कविता लिहिल्या असून, त्यांच्या ‘वडिलोपार्जित’, ‘लेडीज स्पेशल’ आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यावर आधारित ‘खास सचिन’ या कविता संग्रहांचे प्रकाशन झाले आहे.
Ranbir Kapoor: ‘कॅमेरा मुंह के अंदर डाल रहा है, पागल…’, रणबीर कपूरने पापाराझीला फटकारले
पुष्करच्या जडणघडणीत वडिलांचा मोलाचा वाटा
सुधाकर श्रोत्री हे अखेरपर्यंत ‘पार्लेकर कायस्थ’ या त्रैमासिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते. धाकर यांचा पुत्र आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री मराठी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात सक्रिय आहे. आपल्या जडणघडणीत वडिलांचा मोलाचा वाटा असल्याचं पुष्करने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
पुष्कर हा मराठी आणि हिंदी कलाविश्वात कार्यरत असून तो निर्माता आणि दिग्दर्शकही आहे. पुष्करने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही काम केलंय.त्याने मराठी आणि हिंदी भाषांमधील 25 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2014 मध्ये त्याने ‘रेगे’ या चित्रपटात पोलीस अधिकारी सचिन वाझेंची भूमिका साकारली होती.
हेही वाचा:
Ranbir Kapoor: ‘कॅमेरा मुंह के अंदर डाल रहा है, पागल…’, रणबीर कपूरने पापाराझीला फटकारले






