नव्या वर्षात सुरु होतोय ‘सून सासू सून’

Updated On:
नव्या वर्षात सुरु होतोय ‘सून सासू सून’

मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकत नंबर वन हे बिरुद कायम ठेवलं आहे. नवनव्या कार्यक्रमांच्या माध्यमांतून रसिकांना मनोरंजनाची पर्वणी देणारी स्टार प्रवाह वाहिनी नव्या वर्षात असाच एक नवाकोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाचं नाव आहे ‘सून सासू सून’. सासु सुनेचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असंच काहीसं.

सासु सुनेचं हेच गमतीशीर नातं या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात कुठेही घरातील कलह, कुरबुरी आणि मतभेद नसतील तर असेल तो फक्त आणि फक्त सुसंवाद. सासू- सुनांमध्ये हा सुसंवाद घडवून आणण्याचं काम करणार आहे अभिनेता पुष्कार श्रोत्री. स्टार प्रवाह वाहिनीच्या संपूर्ण महाराष्ट्राभर पसरलेल्या कुटुंबाला भेटण्याचं काम पुष्कर या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहे.

https://www.facebook.com/StarPravahOfficial/videos/702033760506725

नव्या वर्षातल्या या नव्या पर्वणीबद्दल सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘सासू आणि सून हे नातं अनोखं आहे. कुटुंब आणि घर जपणाऱ्या या दोघी कधी मैत्रीणी तर कधी मायलेकी असतात. कधी कुरबुर असते पण ती क्षणिक. अश्या हळुवार नाती जपणाऱ्या दोघींना भेटुन समजून थोडा छान वेळ घालवता येईल असा का कार्यक्रम आहे.’

तेव्हा पाहायला विसरु नका नव्या वर्षातला नवा कार्यक्रम सून सासू सून ११ जानेवारी 2021 पासून

आणखी संबंधित बातम्या

Rakesh Bapat: राकेश बापटच्या 'तुझ्याकडे तुला मागणे' मालिकेत झळकणार लोकप्रिय अभिनेत्री

2026-09-12 09:14:00

Rakesh Bapat: राकेश बापटच्या 'तुझ्याकडे तुला मागणे' मालिकेत झळकणार लोकप्रिय अभिनेत्री

Asha Kale : देवा मला यासाठीच आतापर्यंत ठेवलंस का; ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे असं का म्हणाल्या? व्हिडिओ व्हायरल

2026-08-16 07:56:46

Asha Kale : देवा मला यासाठीच आतापर्यंत ठेवलंस का; ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे असं का म्हणाल्या? व्हिडिओ व्हायरल

Aishwarya Narkar: ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’! ऐश्वर्या नारकरांचे 8 वर्षांनंतर स्टार प्रवाहवर पुनरागमन

2026-07-22 10:43:12

Aishwarya Narkar: ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’! ऐश्वर्या नारकरांचे 8 वर्षांनंतर स्टार प्रवाहवर पुनरागमन

Marathi Serial : नेमकं चाललंय तरी काय.? 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' नंतर आणखी एक मोठी मालिका बंद होणार; दिल 'हे' कारण...

2026-06-16 16:29:54

Marathi Serial : नेमकं चाललंय तरी काय.? 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' नंतर आणखी एक मोठी मालिका बंद होणार; दिल 'हे' कारण...

Jui Gadkari: “आईच्या साडीत जुई गडकरीचा मोहक अंदाज; ‘सायली’च्या लूकने चाहत्यांना घातली भुरळ!”

2026-05-05 10:11:30

Jui Gadkari: “आईच्या साडीत जुई गडकरीचा मोहक अंदाज; ‘सायली’च्या लूकने चाहत्यांना घातली भुरळ!”