Abhijit Dipke : दिल्लीत पाऊल ठेवताच अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतले ताब्यात; जंतरमंतर 2.0 आंदोलनापूर्वी कारवाई
Abhijit Dipke : अभिजीत दिपके आंदोलनावर ठाम असल्याने दिल्ली पोलिसांची कारवाई

Abhijit Dipke : दिल्लीत आज 10 ऑक्टोबर 2026 रोजी कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. तसेच, जास्तीत जास्त नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर असून आदल्या दिवसापासूनच आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान मोठी घडामोड घडली आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके, प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली विमानतळावर उतरलेल्या विमानाच्या आत शिरूनच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विमानतळ पोलिसांच्या आणि दिल्ली पोलिसांच्या पथकाने विमानातच त्यांच्यावर कारवाई केली असून, त्यांना विमानतळावरूनच अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे.
View this post on Instagram
नेमकं काय घडलं?
अभिजीत दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळावर उतरताच दिल्ली पोलिसांचे पथक धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानाच्या येथे पोहोचले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुम्ही दिल्लीत आंदोलन करु शकत नाही, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, अभिजीत दिपके यांनी आंदोलन हा आमचा संवैधानिक अधिकार असल्याचे म्हटले.
अभिजीत दिपके ऐकत नसल्याने दिल्ली पोलिसांनी अखेर त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना आता दिल्ली विमानतळावरील वेटिंग रुममध्ये नेण्यात आले आहे. अभिजीत दिपके यांना आता दिल्ली पोलीस किती वेळ ताब्यात ठेवणार याबाबत कोणतीही माहितीसमोर आलेली नाही.
मुंबईहून दिल्लीला पोहोचलेल्या विमानाने लँड करताच प्रवाशांना बाहेर पडण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने विमानाचा ताबा घेतला. विमानाच्या सीटवरूनच अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेण्यात आले. या नाट्यमय कारवाईमुळे विमानातील इतर प्रवाशांमध्येही काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या यू-ट्युबर ध्रुव राठी यालाही ताब्यात घेतले.
हेही वाचा:
Dhruv Rathee : मोठी घडामोड! ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; CJP कडून पोस्ट, जंतर मंतरवरही धरपकड





