Aakash Chopra Statement : “नेहमी संजूचाच बळी का दिला जातो?”, चौथ्या टी-२० पूर्वी आकाश चोप्रांनी संघ व्यवस्थापनाला सुनावले खडे बोल
Aakash Chopra Statement : संजूला संघात स्थान देण्याबाबत त्यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली असून, त्याला लोअर-मिडल ऑर्डरमध्ये खेळवण्याच्या रणनीतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

Aakash Chopra Statement On Sanju Samson Playing XI Ind vs Eng T20I : इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेत टीम इंडिया २-० ने पिछाडीवर पडली आहे. त्यानंतर आता खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हन आणि फलंदाजीच्या क्रमावरून मोठा गदारोळ सुरू आहे. टी-२० वर्ल्ड कपचा हिरो संजू सॅमसनला पहिल्या सामन्यानंतर थेट बाहेर बसवण्यात आल्याने चाहते आधीच संतप्त आहेत. आता या वादात भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी उडी घेतली आहे. संजूला संघात स्थान देण्याबाबत त्यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली असून, त्याला लोअर-मिडल ऑर्डरमध्ये खेळवण्याच्या रणनीतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
“संजूची चूक काय?” आकाश चोप्राचा थेट सवाल –
आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाले, “संजू सॅमसनची नेमकी चूक काय आहे? संघातून कोणाला बाहेर काढायचे असेल तर सर्वात आधी संजूचा बळी दिला जातो आणि संघात घ्यायचे असेल तर त्याला फलंदाजीच्या क्रमात थेट खाली ढकलले जाते. संजू सॅमसनला खेळवायचे असेल तर त्याला पाचव्या क्रमांकावर खेळवू नका. त्याच्यासोबत केएल राहुलसारखा व्यवहार करणे पूर्णपणे चुकीचे आहे, की जेव्हा कधी कोणाला ड्रॉप करायचे असेल किंवा बॅटिंग ऑर्डरमध्ये खाली पाठवायचे असेल तेव्हा तोच बळी ठरेल. मी जेव्हा कधी संजूला संघात घेईन, तेव्हा त्याच्यासाठी ओपनिंग स्लॉट मोकळा करेन; कारण तो तिथेच सर्वोत्तम खेळतो.”
Don’t treat Sanju Samson Like KL Rahul !!
“Sanju hasn’t made any mistakes. He is the first player to be dropped and also the first player to be demoted in the batting order. I won’t play Sanju in the middle-order as he is not suited for that role. I will leave an opening slot… pic.twitter.com/ljWCZh5r08
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) July 9, 2026
आकडेवारीचा विचार केला तर, संजूने आपल्या ५७ टी-२० आंतरराष्ट्रीय डावांपैकी केवळ १० वेळा नंबर ५ किंवा त्यापेक्षा खाली फलंदाजी केली आहे, ज्यामध्ये त्याने २१.१३ च्या बेताच्या सरासरीने अवघ्या १६९ धावा केल्या आहेत.
उपकर्णधार तिलक वर्माचा केला बचाव –
🚨AAKASH CHOPRA MASSIVE STATEMENT ON SANJU SAMSON🤯
Aakash Chopra said :🗣️
“Sanju Samson just won you a World cup & you dropped him. Let that sink in. I know he failed on three occasions but how can you drop a guy that was the Player of the tournament in the mega event? The… pic.twitter.com/lnqO6G40BC
— Akshat (@Akshatgoel1408) July 6, 2026
मालिकेत युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा फ्लॉप ठरत असतानाही संजूला संधी मिळालेली नाही. मात्र, संजूसाठी उपकर्णधार तिलक वर्माला बाहेर काढण्याच्या कल्पनेला आकाश चोप्रा यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, “तिलक वर्मा आपल्या संघाचा उपकर्णधार आहे आणि त्याची कामगिरी इतकीही वाईट नाही. तो ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो ती जागा अत्यंत कठीण आहे. अशा स्थितीत त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा करणे घाईचे ठरेल. संघ व्यवस्थापनाला तिलकबाबत संयम दाखवावा लागेल आणि त्याला संजूसाठी जागा रिकामी करण्याची गरज नाही.”





