Noida Employee Protest: कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ; नोएडा प्रकरणानंतर योगी सरकारचा मोठा निर्णय
Noida Employee Protest : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातम्या फेटाळून लावत, सरकारने स्पष्ट केलं मत

Noida Employee Protest: उत्तर प्रदेशमधील नोएडातील हिंसाचारानंतर योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अखेर रात्री उशिरा किमान वेतनात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही अंतरिम वेतनवाढ १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार असून, विविध श्रेणींमध्ये सुमारे ३००० रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी कामगारांना वेळेवर वेतन, ओव्हरटाइम, साप्ताहिक सुट्टी आणि बोनस देण्याचे आवाहन केले आहे. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कामगारांच्या समस्या गांभीर्याने घेऊन हा संतुलित निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने म्हटले आहे की, यामुळे कामगारांना तात्काळ दिलासा मिळेल आणि उद्योगांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. याशिवाय, इतर कामगार कायद्यांचा व्यापक आढावा घेतला जाईल आणि वेतन मंडळामार्फत कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल.
२०,००० रुपयांपर्यंत वाढवण्याचा दावा दिशाभूल करणारा
यावेळी मुख्यमंत्र्यांनी नोएडातील हिंसाचाराची निंदा करत अराजक पसरवणाऱ्या बाहेरील घटकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातम्या फेटाळून लावत, सरकारने स्पष्ट केले की किमान वेतन २०,००० रुपयांपर्यंत वाढवण्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. केवळ अधिकृत आदेशच वैध असतील. Noida Employee Protest
वेतनात किती वाढ?
– सरकारने गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबादमधील अकुशल कामगारांचे वेतन ११,३१३रु वरून १३,६९० रुपयांपर्यंत वाढवले आहे,
– अर्ध-कुशल कामगारांचे वेतन १२,४४५रु वरून १५,०५९ रुपयांपर्यंत वाढले आहे.
– कुशल कामगारांचे वेतन १३,९४०रु वरून १६,८६८ रुपयांपर्यंत वाढले आहे.
दरम्यान, गेल्या सोमवारी नोएडामध्ये पगारवाढ आणि कामाच्या ठिकाणच्या सुधारणांसाठी खाजगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. सेक्टर-६० आणि ६२ परिसरात झालेल्या या आंदोलनामुळे काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. Noida Employee Protest
हेही वाचा:






