ZP Election | जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सिंधुदुर्गामध्ये भाजप आणि शिंदेसेनेची महायुती झाली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी भाजपाचे आमदार आणि मंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायच समितीच्या निवडणुकीसाठीच्या या युतीचा घोषणा केली. याशिवाय दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. तसेच राष्ट्रवादीलाही सोबत घेण्याचे संकेत राणेंनी दिले. नारायण राणे म्हणाले की, “सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आम्ही तिन्ही पक्षांनी आघाडी करण्याचे ठरवलं आहे. त्यामध्ये भाजप जिल्हा परिषदेच्या ३१ आणि पंचायत समितीच्या ६३ जागांवर लढणार आहे. तर शिंदेसेना जिल्हा परिषदेच्या १९ आणि पंचायत समितीच्या ३४ जागांवर लढणार आहे.” राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचंही निवेदन आलं आहे, असेही नारायण राणे यांनी सांगितले. दरम्यान, नगर परिषद निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजप आणि शिंदेसेना हे घटक पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात लढले होते. मात्र आताच्या निवडणूकीत दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याने सिंधुदुर्गमध्ये राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. ZP Election | दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होतील. तर 16 जानेवारीपासूनच उमेदवारांचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियाला सुरुवात झाली आहे. ZP Election | हेही वाचा : तुतारी गायब? महापालिकेतील अपयशानंतर घड्याळाच्या चिन्हावर लढण्याची शरद पवारांचा पक्ष तयारी करण्याची शक्यता