जुनी सांगवीतील गॅस शवदाहिनी 15 दिवसांपासून बंद

अंत्यविधीची गैरसोयः शवदाहिनी सुरू करण्याची नागरिकांची मागणी

पिंपळे गुरव – सांगवी येथील गॅस शवदाहिनी गेल्या 15 दिवसापासून बंद असल्यामुळे अंत्यविधी करण्यासाठीची गैरसोय झाली आहे. सांगवी, पिंपळे गुरुव या परिसरात पूर आल्यामुळे शवदाहिनी पाण्याखाली गेली होती. त्यामुळे दि. 4 ऑगस्ट दरम्यान शवदाहिनी बंद असल्यामुळे गैरसोय होत आहे.

शवदाहिनी बंद असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, प्रभाग क्र.32 सांगवी, नवी सांगवी, गुरव पिंपळे अंत्यविधीसाठी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. यापूर्वी देखील गॅस शवदाहिनी देखभाल दुरूस्तीसाठी देखील 1 ते 31 मे पर्यंत बंद ठेवण्यात आली होती. सांगवी गॅस शव दाहिनीमधील विद्युत उपकरणे पावसाच्या पुरामुळे पाण्याखाली गेली होती.

त्यामुळे नागरिकांना गॅस दाहिनीवर अंत्यविधी करावयास गैरसोय होत होती. सांगवी गॅस दाहिनी लवकरात लवकर सुरु करण्याबाबत संबंधित अधिकांऱ्यांना वारंवार विद्युत विभागाचे शहर अभियंता तुपे, कार्यकारी अभियंता खाबडे, तसेच बनसोडे यांनी कळविले होते. पण काम होत नाही? असे सांगण्यात आले. पूर ओसरुन देखील आता पंधरा दिवस झाले आहेत. येथील दुरुस्तीचे काम अतिशय संथगतीने चालू आहे. ठेकेदाराला पोसण्याचे तसेच हितसंबंध जपायचे काम चालू आहे. पर्याय व्यवस्था म्हणजे स्टॅडबाय मोटर्स लावल्या पाहिजे होत्या. वेळेत काम न झाल्यास मनसेच्या वतीने लवकरच खळखट्याक होणार, असे राजू सावळे यांनी बोलताना सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×