मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव-गव्हाळीवस्ती येथील शेतकरी सतीश रोडे पाटील यांच्या कुत्र्यावर शनिवारी (दि. 24) रात्री बिबट्याने हल्ला केला असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
या प्रकारामुळे शेतकरंयांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबेगाव तालुक्यात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्यांना निवारा मिळत आहे, परंतु बिबट्या दबक्या पावलांनी लोकवस्तीत येऊन पाळीव प्राण्यावर हल्ला करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच प्राजक्ता रोडे यांनी केली आहे.