जनावरे मोकाट सोडणाऱ्या मालकांवर होणार कारवाई

उत्सवाच्या निमित्त मनपाचा निर्णय

नगर – आगामी काळात येणारे दहीहंडी, गणेश उत्सव व मोहरम हे सण एकत्रीत येत आहे. याकाळात संभाळत असलेली अथवा मालकीची शहरातील रस्त्यावर मोकाटपणे फिरणाऱ्या जनावरांचा संबंधितांनी बंदोबस्त करावा अन्यथा संबधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे.

नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवणात गणेश उत्सव व मोहरम संदर्भात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत मोकाट जनावरांचा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्याची दखल घेत मनपा प्रशासनाने आदेश काढला आहे.

मनपा हद्दीतील सर्व गोठे धारक, तबेले, जनावरेयांच्या मालकांना आवाहन करण्यात आले आहे. आगामी काळात दहीहंडी, गणेश उत्सव, मोहरम मध्ये शहरता नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या उत्सावामध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांमुळे अडथळा निर्माण होतो. मुख्यता: जिल्हा रुग्णालय परिसर, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, माळीवाडा, पत्रकारचौक, मार्केट यार्ड परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा वावर असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.