Best Affordable Cars: भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त टॉप-5 कार, किंमत 5 लाखांपेक्षा कमी; पाहा डिटेल्स

Top 5 Cheapest Car in India: भारतीय ग्राहकांकडून कमी किंमतीत येणाऱ्या कार्सला विशेष पसंती दिली जाते. कितीही लग्झरी कार लाँच झाल्या, तरीही 5 ते 10 लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या कार्सला खरेदी करण्यासाठी आजही ग्राहकांची रांग लागते. भारतीय बाजारात उपलब्ध अशाच 5 सर्वात स्वस्त कार्सविषयी जाणून घेऊया.
Maruti Suzuki Alto K10
मारुती सुझुकी ऑल्टो भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. कंपनीने मागच्या वर्षी ऑल्टो 800 ला बंद केले होते. त्यामुळे ग्राहक आता केवळ ऑल्टो के10 खरेदी करू शकतात. या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. यामध्ये 1.0 लीटर K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे 67 bhp पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते.
Renault Kwid
Renault Kwid 1.0 लीटर SCe पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे 68 bhp पॉवर आणि 91 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड एमटीसह येते. कारची सुरुवाती किंमत 4.69 लाख रुपयांपासून सुरू होते.
Tata Tiago
कमी किंमतीत नवीन कार शोधत असाल तर टाटा टियागो देखील एक चांगला पर्याय आहे. यामध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे 86 bhp पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात सीएनजीचा देखील पर्याय मिळतो. भारतीय बाजारात ही कार 4.99 लाख रुपये एक्स-शोरूम किंमतीसह उपलब्ध आहे.
Maruti Suzuki S-Presso
Maruti Suzuki S-Presso कमी बजेटमध्ये येणारे चांगली कार आहे. या कारची सुरुवाती किंमत (एक्स-शोरूम) 4.26 लाख रुपये आहे. यामध्ये ऑल्टो के10 प्रमाणेच 1.0 लीटर K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. मॅन्युअल ट्रान्समिशसह येणारे कारचे मॉडेलच केवळ 5 लाख रुपयांच्या आत उपलब्ध आहे.
Maruti Suzuki Celerio
Maruti Suzuki Celerio मध्ये 1.0 लीटर पेट्रोलचे इंजिन देण्यात आले असून, हे 67 bhp पॉवर आणि 89 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार एकूण 4 व्हेरिएंटमध्ये भारतीय बाजारात उपलब्ध आहे. कारची किंमत 5.36 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

