शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक-शिंदे Top 10 News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळं ते शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत मीच करेन असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केलं. ते साताऱ्यात बोलत होते. तसेच मी त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नेतृत्व मान्य करुन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला देखील दिला असल्याचे महेश शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसून आगामी काळामध्ये व्यवस्थित होईल, असे देखील आमदार महेश शिंदे म्हणाले. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या कुणबी दाखल्याबद्दल बोलताना आमच्याकडून ओबीसींवर कोणताही अन्याय झाला नसून समोरून कुणबी उमेदवार दिल्याने आम्ही देखील कुणबी उमेदवार दिला असल्याचे स्पष्टीकरण आमदार महेश शिंदे यांनी दिले आहे. सुनेत्रा पवारांविरुद्ध २२ उमेदवार रिंगणात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 23 उमेदवार मैदानात आहेत. त्यातील फक्त दहा उमेदवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातील आहेत. बाकी अन्य उमेदवार हे सोलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, पुणे या भागातील आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघाबाहेरील 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. बारामती पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.यामध्ये सुनेत्रा पवार यांच्यासमोर सगळ्यात जास्त आव्हान उभे करु शकणाऱ्या काँग्रेसच्या आकाश मोरे यांचा समावेश आहे. आजपर्यंतच्या इतिहासात बारामतीमध्ये अजित पवार हे दणदणीत मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारही मोठ्या मताधिक्याने निवडून येणे, ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची बाब झाली होती. त्यामुळे काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण पवार घराण्याने आपली ताकद पणाला लावून काँग्रेसच्या उमेदवाराला माघार घ्यायला राजी केले. आता बारामतीच्या पोटनिवडणुकीत चर्चा होऊ शकतील, अशी दोनच नावं शिल्लक राहिली आहेत, ती म्हणजे, अभिजित बिचुकले आणि करुणा शर्मा मुंडे. मात्र, हे दोघेही बारामतीच्या बाहेरचे उमेदवार असल्याने ते सुनेत्रा पवार यांच्यासमोर कितपत आव्हान निर्माण करु शकतील, याबाबत साशंकताच आहे. देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील भाविकांच्या बसचा अपघात झाला आहे. गुरुवारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 35 प्रवासी जखमी झाले आहेत. वाराणसी-गोरखपूर महामार्गावर भाविकांची पर्यटक बस अनियंत्रित होऊन उलटल्याने हि घटना घडल्याची माहिती आहे. यात बुलढाण्यातील भाविकांचा समावेश असून गाझीपूरजवळ हा अपघात घडलाय. या बसमध्ये एकूण 38 भाविक असून ते तीर्थदर्शनासाठी निघाले होते. यातील 35 यात्रेकरू जखमी असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर 32 यात्रेकरू किरकोळ जखमी असून दोन महिलांचे दुर्दैवी निधन झाले आहे. यातील एक महिला बुलाढाण्यातील रहिवाशी असून एक अकोला जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, दोन्ही पार्थिव त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आहे. खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर, रुपाली चाकणकर यांना एसआयटी पथकाने नोटीसही बजावल्याची माहिती होती, मात्र अद्याप त्यांची कुठलीही चौकशी झाली नाही. आता, रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिस नोटीस बजावणार असल्याची माहिती आहे. समता पतसंस्थेतील खात्यांसदर्भात पोलिस त्यांची चौकशी करणार आहे. समता पतंसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांचे देखील चार खाते आहेत. प्रतिभा चाकणकर यांच्या नावे दोन तर त्यांच्या मुलांच्या नावे दोन खाती आहेत. विशेष म्हणजे, या चार खात्यांवर 2 कोटी 40 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याने आता या पैशांसदर्भात आणि आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी होणार आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत उकाडा वाढला Top 10 News: राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत आहे तर दुरीकडे, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. मुंबईत हळूहळू उकाडा वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तसेच आज कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढणार आहे.राज्यातील अवकाळी पावसाने उघडीप देताच राज्याच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. दिवसभर उकाडा आणि संध्याकाळ नंतर काहीसा गारठा असे चित्र कायम आहे. दुपारच्या वेळेस वाढणारा उकाडा तापदायक ठरत असून नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. जल जीवन मिशनच्या घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई जल जीवन मिशनच्या कथित ९६० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) माजी आयएएस अधिकारी सुबोध अग्रवालला अटक करण्यात आली आहे. नवी दिल्लीतून त्यांना अटक करण्यात आली आहे. एसीबीचे महासंचालक गोविंद गुप्ता यांनी या अटकेला दुजोरा दिला आहे. एसीबीनुसार, या प्रकरणात १० आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, तर चार जण फरार होते. यापैकी सुबोध अग्रवालला दिल्लीतील एका सार्वजनिक ठिकाणाहून सकाळी ११:३० च्या सुमारास अटक करण्यात आली.दरम्यान या प्रकरणातील इतर तीन आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. संजीव गुप्ता, मुकेश आणि जितेंद्र सध्या फरार आहेत.फरार आरोपींच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर, म्हणजेच त्यांचे नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडे अनेकवेळा पथके पाठवण्यात आली. काहीवेळा तपास पथकाच्या हाती धागेदोरे लागले, परंतु प्रत्येक वेळी आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यामुळे त्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. नितीशकुमार आज राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेणार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या राज्यसभेतील प्रवेशामुळे बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झालाय. नितीश कुमार कालच दिल्लीत दाखल झालेत. जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. विमानतळावर नितीश कुमारयांनी, “मी येथे शपथ घेण्यासाठी आलो आहे.” राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांच्या सभागृहात नितीश कुमार वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतील. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राज्यसभेवरील निवडीमुळे बिहारमधील त्यांचा कार्यकाळ संपेल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून १४ एप्रिल रोजी बिहारच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. होर्मुझवरून ट्रम्पचा इराणला अप्रत्यक्षपणे इशारा कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, इराणचा सहभाग असो वा नसो, तेल पुरवठा लवकरच पुन्हा सुरू होईल.असे म्हणत इराणला अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय. मात्र, हे कसे घडेल हे त्यांनी स्पष्ट केले नाही. युद्धविरामाच्या काळात, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारू नये, असा इशाराही ट्रम्प यांनी इराणला पुन्हा दिला. ट्रम्प यांचा हा अल्टिमेटम अशा वेळी आला आहे, जेव्हा अमेरिका आणि इराण होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास सहमत झाले आहेत. इराणने या महत्त्वाच्या जलमार्गातून दररोज १५ जहाजांना जाण्याची परवानगी दिली आहे, आणि ही मर्यादा युद्धविरामाच्या काळातही लागू राहील. दरम्यान ,ट्रम्पनी होंऊर्जमधून जाणाऱ्या टँकर्सकडून इराणने टोल घेणारे तात्काळ थांबवावे. असं म्हटलंय. मुकूल चौधरीच्या वादळात केकेआर गार आयपीएलच्या 15 व्या मॅचमध्ये लखनौ सुपर जायंटसचा कॅप्टन रिषभ पंत यानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. केकेआरनं प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 181 धावा केल्या.लखनौ सुपर जायंटसच्या मुकूल चौधरीच्या वादळी फलंदाजीमुळं केकेआरच्या हातातून विजय निसटला. मुकूल चौधरीनं चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. लखनौसाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुकूल चौधरीनं 27 बॉलमध्ये 54 धावा करत लखनौला विजय मिळवून दिला. लखनौ आणि केकेआर या सामन्याचा निकाल देखील शेवटच्या बॉलवर लागला. मुकूल चौधरीनं 2 चौकार आणि 7 षटकार मारत विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासात तीनवेळा विजेतेपद मिळवणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सला यंदाच्या आयपीएलमध्ये अजून विजय मिळवता आलेला नाही. केकेआरचा यंदाच्या हंगामातील तिसरा पराभव ठरला. केकेआरचा एक सामना पावसामुळं रद्द झाला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वातील केकेआर पहिला विजय कधी मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विजय थलपतीचे भर सभेत मोठे विधान Top 10 News: साउथ सुपरस्टार विजय थलपती Tvk पक्षाकडून तामिळनाडूच्या पेरांबूर आणि त्रिची अशा दोन जागांवरून विधानसभा निवडणूक लढवतोय. गेल्या काही दिवसांपासून विवाहबाह्य संबंध असल्याच्या कारणास्तव विजयाची पत्नी संगीता हिने विजय विरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केलेला. नंतर सोशल मीडियावर विजय आणि साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णन या दोघांचं अफेअर सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या. याचाच फायदा घेत विरोधकांनी विजय थलपतीला घेरल्याचं दिसलं.पण विजयने जाहीर सभेतच विरोधकांना सुनावलं. तो म्हणाला ‘ माझा आवाज दाबण्यासाठी ‘जननायकन’ला अडवलं गेलं. माझ्या वैयक्तिक आयुष्यभर हे चिखलफेक झाली. पण लक्षात ठेवा,वैयक्तिक आयुष्यावर केलेल्या हल्ल्यांनी माझा विश्वास डळमळीत होणार नाही.जितका मला त्रास दिला जाईल, तितकाच माझा जनसेवेचा निर्धार अधिक दृढ होईल. ” असं तो म्हणाला. भर सभेत केलेल्या विजयच्या भाषणाची सध्या मनोरंजनसृष्टीतही चांगलीच चर्चा आहे.