Toll Refund : ‘त्या’ वाहनचालकांना मिळणार टोल रिफंड; राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ फेब्रुवारी रोजी गँस टँकर अपघातनंतर साधारण 32 तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यादरम्यान प्रभावित झालेल्या किमान १.२ लाख वाहनचालकांना (Toll Refund) मोठा दिलासा मिळणार आहे. या सर्व वाहन चालकांना लवकर टोल रिफंड मिळणार आहे.

Toll Refund : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ फेब्रुवारी रोजी गँस टँकर अपघातनंतर साधारण ३२ तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यादरम्यान प्रभावित झालेल्या किमान १.२ लाख वाहनचालकांना (Toll Refund) मोठा दिलासा मिळणार आहे. या सर्व वाहन चालकांना लवकर टोल रिफंड मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास निगमच्या अधिकाऱ्यांनुसार, या सर्व वाहन चालकांना एकूण ५.१६ कोटींचा निधी परत मिळणार आहे. हा रिफंड एक्सप्रेसवेसह पुणे-बंगळुरू राष्ट्रीय राजमार्गावर वसुल केलेल्या टोलवरही लागू असेल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या अपघातानंतर टोल वसुली रोखण्याचे निर्देश जारी करण्यात आले होते. मात्र तरीही ज्या वाहनांच्या फास्टटॅगवरुन निधी कापला गेला, त्याचा डेटा एकत्र करण्यात आला आहे.
येत्या आठवड्यात ही रक्कम संबंधित वाहनचालकांच्या फास्टटॅग खात्यात जमा करण्यात येईल. या घटनेनंतर महामंडळाने त्यांच्या सवलती देणाऱ्या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरकडून सविस्तर माहिती मागितली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत टोल प्लाझाचे बॅरियर पूर्णपणे उघडले जात नाहीत, तोपर्यंत काही व्यवहारांमध्ये स्वयंचलित प्रणालीद्वारे फास्टटॅग कापले जाऊ शकतात. अशी सर्व प्रकरणे ओळखली गेली आहेत आणि परतफेड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रिफंड थेट डिजिटलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.





