Tokyo Olympics : स्पर्धा लांबल्यामुळे लाभ – मीराबाई
Updated On:

नवी दिल्ली – करोनाच्या धोक्यामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षे पुढे ढकलण्यात आली होती. ही स्पर्धा लांबणीवर टाकल्यामुळे खरेतर मला लाभच झाला, असे मत टोकियो ऑलिम्पिकमधील रजतपदक विजेती भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने व्यक्त केले आहे.
मणिपूरच्या 26 वर्षीय मीराबाईने यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिल्याच दिवशी भारताचे पदकाचे खाते उघडताना रजतपदक पटकावले. गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनामुळे देशभरात लॉकडाऊन लावले गेले. त्यामुळे माझ्या सरावात खंड पडला. याच धोक्यामुळे टोकियो ऑलिम्पिकही लाबणीवर टाकले गेले.
सरावादरम्यान माझ्या खांद्याला दुखापत झाली होती. हा वेळ मला मिळाला व माझी दुखापत बरी झाली व मी ऑलिम्पिकमध्ये खेळूू शकले त्यामुळेच ही स्पर्धा लांबणीवर पडल्याचा मला लाभच झाला, असेही तिने सांगितले.





