Roasted Raisins: हिवाळ्याच्या दिवसांत सर्दी, खोकला, नाक वाहणं अशा तक्रारी वाढतात. त्यामुळे या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. बदलत्या हवामानात योग्य आहार घेतला, तर शरीर निरोगी राहायला मदत होते. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात मनुका खाणं खूप फायदेशीर ठरतं. भिजवलेली किंवा हलकी भाजलेली मनुका पोषक घटकांनी भरलेली असून ती शरीराला उष्णता आणि ऊर्जा देते. हिवाळ्यात मनुका का आहे सुपरफूड? हिवाळ्यात शरीराला जास्त ऊर्जा आणि पोषणाची गरज असते. मनुकामध्ये आयर्न, कॅल्शियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे घटक शरीर आतून मजबूत करतात आणि थंडीचा त्रास कमी करतात. पचनसंस्था ठेवते निरोगी रात्री भिजवून सकाळी खाल्लेली मनुका पचन सुधारते. त्यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. हिवाळ्यात पचन मंद होतं, अशा वेळी भिजवलेली मनुका खूप उपयोगी ठरते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते मनुकामधील जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स इम्युनिटी मजबूत करतात. नियमित सेवन केल्यास सर्दी-खोकला आणि संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. रक्त आणि हाडांसाठी फायदेशीर मनुका हा आयर्नचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. त्याचबरोबर कॅल्शियम आणि बोरॉनमुळे हाडं मजबूत राहतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. ऊर्जा आणि त्वचेसाठी लाभदायक सकाळी उपाशीपोटी भिजवलेली मनुका खाल्ल्याने लगेच ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो. तसेच त्वचेला आतून पोषण मिळाल्याने हिवाळ्यातील कोरडेपणा कमी होतो. एकूणच, हिवाळ्यात भिजवलेली किंवा भाजलेली मनुका आहारात समाविष्ट करणं आरोग्यासाठी सोपं आणि प्रभावी उपाय आहे.