IND vs AUS | दुसऱ्या कसोटीपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा! CEOपदी ‘या’ दिग्गजाची केली नियुक्ती….

IND vs AUS 2nd Test :- माजी राष्ट्रीय रग्बी लीग प्रमुख टॉड ग्रीनबर्ग (Todd Greenberg) हे पुढील वर्षीपासून क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून निक हॉकली यांची जागा घेतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी याची घोषणा केली.
Cricket Australia has announced that Todd Greenberg has been appointed as the new Chief Executive Officer, commencing at the end of the domestic summer. pic.twitter.com/4nrtx12Hfq
— Cricket Australia (@CricketAus) December 3, 2024
ग्रीन सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पुढील वर्षी मार्चमध्ये ते त्यांचे नवीन पद स्वीकारतील. चालू देशांतर्गत हंगामाच्या अखेरीस आपण आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे त्यांनी ऑगस्टमध्ये जाहीर केले होते.
ग्रीनबर्ग यांनी यापूर्वी क्रिकेट न्यू साउथ वेल्समध्ये काम केले आहे. ते सिडनीच्या रँडविक क्रिकेट क्लबसाठी एक आघाडीचे फलंदाज म्हणून खेळत होते.
ग्रीनबर्ग निवडीनंतर म्हणाले की, क्रिकेटचा जगभरात विकास होत असल्याने हा अतिशय रोमांचक काळ आहे. त्याच वेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटने खेळाच्या शीर्षस्थानी आपले स्थान कायम राखावे, यासाठी काही आव्हाने आहेत, ही आव्हाने आम्हाला सोडवावी लागणार आहेत.

