मेष : सुसंवाद चांगला ठेवा. सहकाऱ्यांकडून खुशीने काम करून घ्याल. घरात अपेक्षित प्रगती होईल.
वृषभ : ग्रहमानाची साथं राहील त्यामुळे सुखाने श्वास घेऊ शकाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील.
मिथुन : पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच होईल. वातावरणाचा परिणाम व्यवसायावर जाणवेल.
कर्क : पैशाची बाजू समाधानकारक राहील. कामानिमित्ताने प्रवासयोग. घरात वातावरण आनंदी राहील.
सिंह : खर्चावर नियंत्रण ठेवता आल्याने मानसिक शांतता मिळेल. कष्टाचे सार्थक झाल्याने समाधान लाभेल.
कन्या : नोकरीत तुम्ही तुमचे धोरण लवचिक ठेवलेत तर त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. जोडधंदयातून विशेष लाभ.
तूळ : वरिष्ठ तुमच्या कामाच्या पद्धतीत व स्वरूपात फेरबदल करतील. अनेक गोष्टी करण्याकडे कल राहील.
वृश्चिक : नेमके कशाला प्राधान्य दयायचे असा थोडा संभ्रम होईल. कुवतीपेक्षा जास्त धोका कामात पत्करू नका.
धनु : व्यवसायात भावनावेग आवरा व कर्तव्याला प्राधान्य देऊन तसेच व्यवहारी दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्यावेत.
मकर : पैशाची कुवत व तांत्रिक अडथळ्यांचा विचार करून नवीन गुंतवणूक करा.
कुंभ : नोकरीत दिलेली जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न करावा फायद्यापेक्षा विश्वासार्हता जपावी.
मीन : घरात आहे त्यात समाधानी रहावे. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तब्येत सांभाळून कामे करावीत.