US-Iran War: ‘आजचा दिवस इराणवरील सर्वात तीव्र हल्ल्यांचा असेल’; अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ यांचा इशारा
US-Iran War: अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ यांनी मंगळवारी इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत मोठी वाढ होणार असल्याचे संकेत दिले.

US-Iran War: अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ यांनी मंगळवारी इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत मोठी वाढ होणार असल्याचे संकेत दिले. पेंटागन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, आजचा दिवस इराणवरील आतापर्यंतच्या सर्वात तीव्र अमेरिकी हल्ल्यांचा असेल.
‘सर्वाधिक लढाऊ विमाने, बॉम्बर्स तैनात’ –
ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांच्यासमवेत बोलताना हेगसेथ म्हणाले की, अमेरिकी सैन्य “लेझर-फोकस्ड, कमाल अधिकारासह” अत्यंत अचूकतेने व भारी लष्करी ताकदीने कारवाई करत आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक लढाऊ विमाने, बॉम्बर्स व समन्वित हल्ल्यांचा या मोहिमेत समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
🚨WATCH:
U.S. Secretary of Defense Pete Hegseth:
“Today will be yet again our most intense day of strikes inside Iran. The most fighters…. the most bombers, the most strikes. Intelligence more refined and better than ever.”
“The last 24 hours have seen Iran fire the LOWEST… pic.twitter.com/L6CpIuN1hN
— Open Source Intel (@Osint613) March 10, 2026
इराण एकटा पडला-
हेगसेथ यांनी दावा केला की इराण आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडत चालला असून लष्करीदृष्ट्याही तो कमकुवत होत आहे. तेहरानचे अनेक प्रादेशिक सहकारी दूर झाले असून हेजबोल्लाह, हुथी आणि हमास या त्याच्या प्रॉक्सी संघटना एकतर कमजोर झाल्या आहेत किंवा निष्क्रिय आहेत, असेही ते म्हणाले.
तसेच इराणने शाळा व रुग्णालयांसारख्या नागरी ठिकाणांवरून क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप करत तेथील नेतृत्वावर निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
हेही वाचा – व्यावसायिक गॅस पुरवठा बंद; 48 तासांत निम्मी मुंबई उपाशी राहणार?
भूतकाळातील चुका पुन्हा होणार नाहीत
हेगसेथ यांनी स्पष्ट केले की ही मोहीम अफगाणिस्तान व इराकमधील दीर्घकालीन राष्ट्रबांधणी मोहिमांपेक्षा वेगळी आहे. अमेरिका पुन्हा अशा प्रदीर्घ युद्धात अडकणार नाही, असे त्यांनी ठणकावले.
अबुधाबीतील रिफायनरीला आग –
दरम्यान, अबुधाबी प्राधिकरणाने सांगितले की इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे रुवेस औद्योगिक संकुलातील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला (रिफायनरी) आग लागली. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.





