आज पुन्हा भारतीय रुपयाची किंमत घसरली
Updated On:

मुंबई – भारतीय रुपयाची किंमत आज पुन्हा घसरली आहे. आज चलन बाजारात रुपयाचे मूल्य 34 पैशांनी कमी होऊन ते डॉलरच्या तुलनेत 74 रुपये 20 पैसे इतके झाले आहे.
शुक्रवारी बाजार बंद होताना भारतीय रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 73 रुपये 86 पैसे इतकी होती.
कच्चा तेलाच्या वाढत्या भावामुळे जे अनेक परिणाम दिसून येत आहेत त्यातच रुपयाच्या किमतीवरही हा परिणाम दिसून आला आहे असे चलन बाजारातील काही तज्ज्ञांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती आज 73.71 डॉलर्स प्रतिबॅरल इतक्या झाल्या आहेत.





