“चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेला…”; दिव्या खोसलाने करण जोहरला सुनावले

Divya Khosla Vs Karan Johar | अभिनेत्री दिव्या खोसलाने काही दिवसांपूर्वी आलिया भटच्या ‘जिगरा’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून गंभीर आरोप केले होते. यानंतर करण जोहरने देखील नाव न घेता एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर दिव्या आणि करण यांच्यातील वाद आणखी वाढला आहे. दिव्या खोसलाने पुन्हा एकदा ‘जिगरा’ सिनेमाच्या टीमवर आरोप करत करण जोहरवर टीका केली.
दिव्या खोसलाने एका मुलाखतीत करण जोहरवर संताप व्यक्त करत आलिया भटवरही निशाणा साधला आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, “आज मी बोलत असताना करण जोहर मला गप्प करण्यासाठी अपशब्द वापरतो. चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेला मूर्ख बोलणं योग्य आहे का? जर माझ्यासोबत असं झाले तर इंडस्ट्रीतील नवीन लोकांसोबत काय होत असेल?,” असा सवाल ती करते.
दिव्या खोसला पुढे म्हणाली, “येथे कोणी राजा नाही. त्यामुळे मला कोणीही अशी वागणूक देऊ शकत नाही. इतर अनेक अपमानास्पद शब्द आहेत जे त्यांच्या PR लेखांमध्ये वापरले गेले होते आणि माझी भूमिका घेण्यास PR स्टंट म्हटले गेले. माफ करा, पण मला त्याची गरज नाही. लोक मला आधीच ओळखता,” असे उत्तर दिव्याने करण जोहरला दिले. Divya Khosla Vs Karan Johar |
दरम्यान, दिव्या खोसलाने आलियावर निशाणा साधल्यानंतर करण जोहरने इंस्टाग्राम स्टोरीवर ‘मूर्खांना गप्प बसूनच उत्तर देणे चांगले आहे,’ असे म्हंटले होते. त्यावर दिव्या खोसलाने देखील आता प्रत्युत्तर दिले आहे. Divya Khosla Vs Karan Johar |
हेही वाचा:





