देशात स्वतंत्र 166 आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र सुरू करणार
Updated On:

नवी दिल्ली – यूआयडीएआय म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्डाची नोंदणी व त्यातील दुरुस्त्यांसाठी देशात 166 स्वतंत्र केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या या 166 केंद्रांपैकी 55 आधारसेवा केंद्र देशात सुरू आहेत. त्या खेरीज बॅंका, पोस्ट कार्यालये आणि राज्य सरकारांद्वारे आधार नोंदणीसाठी देशभरात 52 हजार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
तथापि, आधार कार्डाची नोंदणी व त्यातील दुरुस्त्यांचे काम करणारी स्वतंत्र 166 केंद्र देशातील 122 शहरांमध्ये स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लोकांच्या आधार कार्डाशी संबंधित बहुतांशी अडचणी दूर होऊ शकणार आहेत. यातील जी 55 केंद्र सध्या सुरू आहेत, ती आठवड्यातील सातही दिवस सुरू असतात.





