Anushka Shetty : स्क्रोलिंगच्या पलीकडे पुन्हा कनेक्ट होण्यासाठी…; बाहुबलीफेम अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय

Anushka Shetty : साऊथ सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शेट्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. अनुष्काने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत. तिने हा निर्णय का घेतला याचं कारण एक पोस्ट शेअर करत दिलं आहे.
पोस्टमध्ये अभिनेत्रीने सध्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे, असं म्हटलं आहे. अनुष्काने एक चिठ्ठी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. ‘जगाशी आणि स्क्रोलिंगच्या पलीकडे पुन्हा कनेक्ट होण्यासाठी. निळ्या प्रकाशापासून ते मेणबत्तीच्या प्रकाशापर्यंत… मी सोशल मीडियापासून दूर जात आहे जेणेकरून मी जगाशी कनेक्ट होऊ शकेन, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
यासोबतच तिने स्क्रोलिंगच्या पलीकडे काम करा, जिथून आपण सर्वांनी खरोखर सुरुवात केली होती, असं आवाहनही केलं आहे. लवकरच भेटूया आणखी कथा आणि प्रेमासह. नेहमी हसत राहा. असंही अनुष्काने पोस्टमध्ये लिहिलं आहे. अलिकडेच अभिनेत्री अनुष्का शर्माचा घाटी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे ती चर्चेत आली होती. तसं पाहिला गेलं तर अनुष्काचा सोशल मीडियावरील वावर कमी आहे. तिने शेअर केलेल्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे.
‘घाटी’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, ५ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. सिकनिकच्या अहवालानुसार, या चित्रपटाने एका आठवड्यात भारतात ६.६४ कोटींची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन क्रिश जगरलामुडी यांनी केलं आहे. विक्रम प्रभूसोबत अनुष्का या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. आता अनुष्का ‘कटनार’ या हॉरर थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून अनुष्का मल्लाळम चित्रपटात पदार्पण करणार आहे.
हेही वाचा : “काही लोक समांतर भाजप चालवत आहेत…” ; हरियाणाचे मंत्री अनिल विज यांचा स्फोटक दावा





