Sushma Andhare : “फडणवीसांनी दिल्लीत पोहोचू नये, म्हणून…”; अंधारेंचा खळबळजनक दावा म्हणाल्या “तुम्ही एक भस्मासूर…”
Sushma Andhare : या बैठकीनंतर खासदारांकडून लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

Sushma Andhare : महाराष्ट्राच्या राजकारणात चार वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. तसे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये जाऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर दिल्लीत ठाकरे गटातील संबंधित खासदारांसोबत बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीनंतर खासदारांकडून लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून अॅापरेशन टायगर राबवले जात असल्याचे आता सांगण्यात येत आहेत. याबाबत गुप्त बैठका देखील झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंच्या संभाव्य 6 खासदारांच्या फुटीबाबत चर्चा सुरू असतानाच या खासदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांत शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, त्यामुळे 19 जून रोजी ठाकरेंचे सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या सर्व घडामोडींमध्ये ठाकरे गटाच्या आक्रमक महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याची विशेष चर्चा होत आहे. त्यांनी थेट नाव न घेता एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
लगेगी आग,
तो आएंज कई घर अपनी जद में
यहां पर सिर्फ हमारा मकान थोड़ी है । @Dev_Fadnavis pic.twitter.com/tGTudqAVt7— SushmaTai Andhare (@andharesushama) June 16, 2026
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
“देवेंद्र फडणवीस तुमच्या एका मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही एक भस्मासूर जन्माला घातला. आता भस्मासूराची ताकद ऐवढी वाढली की, तुमच्या डोक्यावर हात ठेवायला कमी करणार नाही, इथपर्यंत हात सरसावले आहेत. फडणवीसांच्या दिल्लीत जाण्याच्या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. फडणवीसांनी दिल्लीत पोहोचू नये, म्हणून फडणवीसांच्याच पक्षातले दिल्लीतील नेते फडणवीस दिल्लीत पोहोचू नये, याकरिता लांबसडक स्पीड ब्रेकर टाकण्याच्या तयारीत आहेत. अगदी दिल्ली टू दरे..”
संभाव्य फुटीर गटातील एका खासदाराला लागणार लॅाटरी?
6 खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे ठाकरे गटासमोर नवे आव्हान उभे राहिले असून, दिल्लीतील घडामोडींवर आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या खासदारांना आगामी निवडणुकीत उमेदवारी, मतदारसंघासाठी निधी तसेच एका खासदाराला मंत्रीपदाचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे. त्यामुळे आता याबाबत कोणती नवी माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा : Rajabhau Waje : अॅापरेशन टायगरची चर्चा; ठाकरेंचा खासदार दिल्लीला रवाना, स्वतः दिली माहिती म्हणाले “मी आता…”






