नवऱ्याला अधिकारी बनविण्यासाठी पत्नीने दुसऱ्याच्या घरी केली धुणी-भांडी अन् अधिकारी होताच त्याने…

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या एसडीएम ज्योती मौर्य यांचा पतीसोबतचा वाद सध्या चर्चेत आहे. असाच प्रकार मध्य प्रदेशातील देवासमध्येही समोर आला आहे. ज्यामध्ये पत्नीने पतीला शिकवण्यासाठी भांडी धुवून पैसे कमवून मदत केली. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पती व्यावसायिक कर अधिकारी झाला तेव्हा त्याने पत्नीशी संबंध तोडले आणि दुसरे लग्न केले.
ही घटना घडली देवासच्या बागली भागातील येथे राहणाऱ्या ममता या आदिवासी महिलेची. अलीराजपूर जिल्ह्यातील कोठाडी गावात राहणाऱ्या कामरूवर तिचे प्रेम होते. दोघांनी आठ वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज केले होते. कामरूला तेव्हा नोकरी नव्हती, पण तो पदवीधर होता आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. त्याच्या अभ्यासात मदत करण्यासाठी ममता इतरांच्या घरी भांडी धुण्याचे काम करत होती, तसेच दुकानात काम करून तिने त्यावेळी पतीला परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी आर्थिक मदत केली.
कामरूला 2019-20 मध्ये यश मिळाले. कामरू यांची कमर्शियल टॅक्स ऑफिसर या पदावर निवड झाली. यानंतर त्याची पहिली पोस्टिंग रतलाममध्ये झाली. दरम्यान, त्याची जोबात येथील एका तरुणीशी ओळख झाली. दोघांची मैत्री घट्ट झाली, त्यामुळे कामरूने ममताला तिच्या माहेरच्या घरी पाठवले. काही दिवसांनी तो मुलीसोबत राहू लागला आणि पुन्हा लग्न केले. त्याने ममताला सोबत ठेवले नाही. यानंतर ममताने पतीविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली. कोर्टातही कामरूने ममता आपली पत्नी असल्याचे मान्य केले आहे, पण तो तिला पोटगी देत नाही.
कमरू हा ममताचा दुसरा नवरा आहे. तिचे पहिले लग्न 16 वर्षांपूर्वी झाले होते, मात्र लग्नाच्या अडीच वर्षानंतरच पतीचा मृत्यू झाला. पहिल्या पतीच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. यानंतर कामरू तिच्या संपर्कात आला आणि दोघांनी लग्न केले. ममताला पतीसोबत राहायचे आहे, पण अधिकारी झाल्यानंतर पती कामरूला तिच्यासोबत राहायचे नाही.





