Union Budget 2025 : भारतीय भाषा योजना लागू करणार; वैद्यकीय शिक्षणाच्या ७५ हजार जागा वाढवणार: अर्थमंत्र्याची महत्वाची घोषणा

नवी दिल्लीः देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी २०२५-२६ चा अर्थसंकल्पाचे वाचन करून त्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली आहे. सबका साथ सबका विकास हेच आमचे उदिष्ट असल्याचे अर्थसंकल्पाच्या वाचनावेळी सितारमण म्हणाल्या. केंद्र सरकारकडून १० महत्वाचे मुद्दे देखील यावेळी त्यांनी मांडले. राज्यांच्या साह्याने विकसित भारताच्या संकल्पूनेतून प्रेरणा घेणारा अर्थसंकल्प सादर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा पुस्तक योजना लागू करणार असून वैद्यकीय शिक्षणाच्या ७५ हजार जागा वाढणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा यावेळी त्यांनी केली आहे.
देशात भारतीय भाषा पुस्तक योजना लागू करणार आहोत. डिजीटल फॉर्ममध्ये भारतीय भाषेतील पुस्तकं तयार करणार असल्याचे म्हणत यामुळे शालेय आणि उच्च शिक्षणात वापर करण्यात येणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत शिक्षणास उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या 75 हजार जागा वाढवणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा देखील सितारमण यांनी केली आहे.
शाश्वत शहरांसाठी ५००० हजार कोटी रुपयांचे तरतूद
तसेच सेंटर ऑफ एक्सलेन्स इन एआय इन एज्युकेशनसाठी तीन सेंटर ऑफ एक्सलेन्स तयार करण्यात येणार आहे. कृषी, आरोग्य आणि शाश्वत शहरांसाठी 5000 हजार कोटी रुपयांचे तरतूद करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार आमच्या सरकारने पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या 1 लाख 10 हजार जागा वाढवल्या आहेत. पुढच्या पाच वर्षात 75 हजार जागा वाढवणार असल्याचे लक्ष्य असल्याचे सितारमण यांनी सांगितले.





