पुणेः सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनकडून अमेरिका साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून निवृत्त पोलीस महासंचालक मीरा वढ्ढा बोरवणकर उपस्थित होत्या. महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ, साधना ट्रस्ट पुरस्कार प्रदान सोहळ्याचे संयाेजक होते. ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांना दिलीप चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच डॅा. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार ओडिशातील चेटकीण प्रथा आणि अंधश्रद्धेविरोधात लढा देणारे देबेंद्र सुतार यांनी देण्यात आला. मीरा बोरवणकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
सध्या सर्वत्र अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झालेल्या बातम्यांच्या अनुषांगाने विविध बातम्या माध्यमात येत आहेत. सैफ अली खान यांच्यावरील हल्ला प्रकरणी प्रसारमाध्यमांनी माझ्याशी संपर्क साधला आणि प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोरवणकर यांनी सांगितले. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर प्रसारमाध्यमे त्याची दखल घेतात. नागरिकही आवाज उठवतात. मात्र, न्यायप्रणालीत बदल करण्यासाठी कोणीच आवाज उठवत नाही. फास्ट ट्रक न्यायालयात खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली जाते. न्यायाधीशांची अपुरी संख्या, पायाभूत सुविधा, अपुरे पोलीस मनुष्यबळाविषयी कोणी भाष्य करत नाही, असे परखड आणि स्पष्ट मत निवृत्त पोलीस संचालक मीरा बोरवणकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.