Kate Winslet Oscar trophy : टायटॅनिक’ अभिनेत्री केट विन्सलेटने बाथरूममध्ये ठेवली ऑस्करची ट्रॉफी.. !

Kate Winslet Oscar trophy : ऑस्कर पुरस्कार विषयी जवळपास सर्वांनाच माहिती आहे. हा जगातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. हॉलिवूड असो की बॉलीवूड, प्रत्येक स्टार नक्कीच ही ट्रॉफी मिळवण्याची आकांक्षा बाळगतो. पण ‘टायटॅनिक’ फेम केट विन्सलेटने ऑस्करची ट्रॉफी तिच्या बाथरूममध्ये ठेवली आहे, यामागचे कारण खूप रंजक आहे.
केट विन्सलेटने असा खुलासा केला की,’सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिने सांगितले की ती तिची ऑस्कर ट्रॉफी बाथरूममध्ये ठेवते.तिने हा पुरस्कार बाथरूममध्ये का ठेवला हेही सांगितले.
केट विन्सलेट म्हणाली, ‘कारण प्रत्येकवेळी जेव्हा कोणी बाथरूम वापरायला जातो तेव्हा तो ऑस्करसोबत आरशात वेळ घालवू शकतो…प्रत्येकाने ते उचलावे आणि म्हणावे, ‘मी माझ्या मुलाचे आणि माझ्या वडिलांचे आभार मानू इच्छितो’ आणि कोणीतरी ते केव्हा केले असेल ते तुम्ही नेहमी सांगू शकता, कारण नंतर ते फ्लश करण्यासाठी जातात. त्यानंतर थोडा वेळ तिथे घालवू. जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा त्या प्रत्येकाचे गाल थोडे गुलाबी असतात.’





