तिरुपतीमधील अनेक हॉटेल्सना बॉम्बच्या धमक्या ; ईमेलमध्ये ड्रग माफिया जाफर सादिकचा उल्लेख

Tirupati Hotels Bomb Threats। मागील काही दिवसांपासून देशातील विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळत आहेत. हे कमी असताना आता तिरुपतीमधील अनेक हॉटेल्सना बॉम्बच्या धमकीचे ईमेल मिळाले असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. या ईमेलमध्ये ड्रग स्मगलिंग नेटवर्कचा कथित नेता जाफर सादिक याच्या नावाचा उल्लेख आहे, ज्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि ईडीने अटक केली होती.
विमाने आणि शाळा, महाविद्यालयांनंतर आता हॉटेल्सना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. धमक्या मिळाल्यानंतर पोलिस कर्मचारी आणि स्निफर डॉग्सनी हॉटेल्सचा तपास केला. ज्यामुळे ही धमकी फसवी असल्याचा संशय निर्माण झाला. या धमक्यांचे मूळ शोधण्यासाठी पोलीस आता तपास करत आहेत. भगवान तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तिरुपतीला येतात, त्यामुळे येथील हॉटेल व्यवसाय चांगला चालतो.
तीन खासगी हॉटेलांना धमक्या आल्या Tirupati Hotels Bomb Threats।
तिरुपतीमधील लीलामहल, कपिलतीर्थम आणि अलीपिरीजवळील तीन खासगी हॉटेलांना ईमेलद्वारे धमक्या आल्या होत्या. ड्रग माफिया जाफर सादिकचेही नाव ईमेलमध्ये आल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून फ्लाइट आणि शाळा-कॉलेजांना बॉम्बच्या धमक्या येत आहेत.
एक दिवस आधी ८५ विमाने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. यामध्ये एअर इंडियाच्या 20 विमानांचा समावेश होता. ज्या विमानांना धमक्या मिळाल्या होत्या त्यामध्ये 20 इंडिगो, 20 विस्तारा आणि 25 आकासा फ्लाइट्सचा समावेश होता.
हेही वाचा
लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईचाही मोस्ट वाँटेड यादीत समावेश ; NIA कडून 10 लाखांचे बक्षीस जाहीर





