IPL 2025 : आरसीबीचा प्लेऑफपूर्वी मास्टर स्ट्रोक! ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला संघात केलं सामील

Tim Seifert Replaces Jacob Bethel in RCB for IPL 2025 : आयपीएल २०२५ चा हंगाम आता रोमांचक आणि अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. यंदा रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने शानदार कामगिरी करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. आता संघाचे लक्ष प्लेऑफमध्ये होणाऱ्या सामन्यावर आहे. सध्या, आरसीबी १७ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर, आरसीबीने आपल्या संघात एका धडाकेबाज खेळाडूला सामील केले आहे. जो जेकब बेथेलची जागा घेईल.
या खेळाडूला मिळाले स्थान
आरसीबीने प्लेऑफच्या सामन्यांसाठी जेकब बेथेलच्या जागी टिम सेफर्टला संधी दिली आहे. जेकब बेथेलने राष्ट्रीय कर्तव्य असलेल्या इंग्लंडला संघाकडून खेळण्यासाठी उर्वरित आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे. ३० वर्षीय टिम सेफर्ट पहिल्यांदाच आरसीबीमध्ये सामील झाला आहे. यापूर्वी, सेफर्ट आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. सेफर्टने न्यूझीलंडसाठी ६६ टी-२० सामने खेळले आहेत.
🚨 TIM SEIFERT REPLACE JACOB BETHELL FOR RCB IN IPL PLAYOFFS. 🚨 pic.twitter.com/ViMLsHVLeD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 22, 2025
टिम सेफर्टने आतापर्यंत खेळलेल्या ४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १९.६६ च्या सरासरीने ५९ धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने ६६ टी-२० सामन्यांमध्ये २८ च्या सरासरीने १५४० धावा केल्या आहेत. सेफर्टने १० अर्धशतकेही झळकावली आहेत. सेफर्टला जगातील जवळजवळ सर्व टी-२० लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे.
सेफर्टला जगातील जवळजवळ सर्व टी-२० लीगमध्ये खेळण्याचा अनुभव –
तो पीएसएल, आंतरराष्ट्रीय टी-२०, बिग बॅश, कॅरिबियन प्रीमियर लीग आणि लंका प्रीमियर लीगमध्ये खेळला आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने १६ सामन्यांमध्ये ४०८ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये ७८८ धावा केल्या आहेत. याशिवाय, लंका प्रीमियर लीगमध्ये त्याच्या नावावर ६३१ धावा आहेत. सेफर्ट आता आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीविरुद्ध आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहे.





