Tim David : टिम डेव्हिडच्या पावसाच्या पाण्यातील घसरगुंडीने वेधलं लक्ष, VIDEO होतोय व्हायरल

Tim David’s Rainy Fun Goes Viral : आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामाला १७ मे पासून पुन्हा सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बीसीसीआयने आयपीएलवर स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलली होती. परंतु, शनिवारी आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामन्याने आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी टिम डेव्हिडचा एक व्हिडीओ आरसीबीने शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पावसाच्या पाण्यात खेळताना दिसत आहे.
आरसीबीने टिम डेव्हिडचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर –
खरंतर, काल बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे एम चिन्नास्वामी मैदान पूर्णपणे ओले झाले आणि तिथे पाणी साचले होते. त्यानंतर आरसीबीचा अनुभवी खेळाडू टिम डेव्हिड पावसाचा आनंद घेताना दिसला. आरसीबीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येत आहे की एकीकडे ग्राऊंड स्टाफ मैदान स्वच्छ ठेवण्यासाठी मैदानावरील पाणी हटवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे टिम डेव्हिडने मैदानात साचलेल्या पाण्यात घसरगुंडी खेळताना दिसत आहे.
टिम डेव्हिड पावसाच्या पाण्यात घसरगुंडी खेळतानाचा व्हिडीओ –
Tim David ❌
Swim David ✅Bengaluru rain couldn’t dampen Timmy’s spirits… Super TD Sopper came out in all glory. 😂
This is Royal Challenge presents RCB Shorts. 🩳🤣#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/PrXpr8rsEa
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 16, 2025
टिम डेव्हिडचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. प्रत्येकजण म्हणत आहे की परदेशी खेळाडूने मैदानाला स्विमिंग पूलमध्ये रूपांतरित केले. आरसीबी चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. परंतु, आता आरसीबी आणि केकेआर यांच्यात १७ मे रोजी खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
हेही वाचा – Prithvi Shaw : पृथ्वी शॉच्या इन्स्टा पोस्टने सोशल मीडियावर माजवली खळबळ, काय आहे पोस्ट? जाणून घ्या
विशेष म्हणजे आयपीएलच्या १८व्या हंगामात आरसीबीला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. कारण या संघाची यंदाची कामगिरीच तशीच राहिली आहे. आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या ११ पैकी ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि ३ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.





