Tilak Varma Injury : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून अचानक पडला बाहेर

Tilak Varma ruled out after injury : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट युद्धाला ११ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा युवा स्टार फलंदाज तिलक वर्मा दुखापतीमुळे मालिकेतील पहिल्या तीन टी-२० सामन्यांमधून बाहेर पडला आहे. तिलकवर नुकतीच एक आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली असून, बीसीसीआयने (BCCI) अधिकृत निवेदनाद्वारे याची माहिती दिली आहे.
राजकोटमध्ये झाली यशस्वी शस्त्रक्रिया –
७ जानेवारी रोजी राजकोटमध्ये तिलक वर्मावर ‘टेस्टीक्युलर टॉर्शन’ (Testicular Torsion) या समस्येसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून गुरुवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिलक आता हैदराबादला रवाना होणार असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली विश्रांती घेणार आहे. पूर्णपणे बरे झाल्यानंतरच तो मैदानात सरावासाठी परतू शकेल.
पहिल्या तीन सामन्यांना मुकणार; पुनरागमन कधी?
🚨 NEWS 🚨
Tilak Varma ruled out of the first three T20Is against New Zealand.
His availability for the remaining two matches will be assessed based on his progress during the return-to-training and skill phases.
Details 🔽 | #TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank…
— BCCI (@BCCI) January 8, 2026
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यांची टी-२० मालिका २१ जानेवारीपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. सद्यस्थितीत तिलक वर्मा मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत खेळू शकणार नाही. पुनरागमनाबद्दल बोलायचे तर मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमधील त्याचा सहभाग हा पूर्णपणे त्याच्या ‘रिकव्हरी’वर अवलंबून असेल. जर तो फिटनेस टेस्टमध्ये पास झाला, तरच त्याला मैदानात उतरवले जाईल.
हेही वाचा – WPL 2026 बिगुल वाजलं! पहिल्याच सामन्यात मुंबई आणि आरसीबी आमनेसामने; फ्रीमध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या
मिडल ऑर्डरमध्ये चिंतेचे वातावरण –
गेल्या काही काळापासून तिलक वर्मा भारतीय टी-२० संघात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर सातत्याने चांगली कामगिरी करत होता. त्याच्या अनुपस्थितीत आता मधल्या फळीची जबाबदारी सांभाळण्यासाठी टीम मॅनेजमेंटला संजू सॅमसन, रिंकू सिंह किंवा शिवम दुबे यांपैकी कोणावर विश्वास दाखवायचा, याचा विचार करावा लागेल. विशेष म्हणजे, बीसीसीआयने अद्याप त्याच्या जागी पर्यायी खेळाडूची घोषणा केलेली नाही.
पहिल्या ३ टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, अक्षर पटेल (उपकर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.





