पुणे | टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयास नॅक “ए’ श्रेणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयास नॅक मूल्यांकन समितीकडून “ए’ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडली आहे, असे संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन दि. 30 व 31 ऑगस्ट रोजी पार पडले. याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात महाविद्यालयास “ए’ श्रेणी मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांत महाविद्यालयाने अभ्यास, अभ्यासेत्तर व इतर अभ्यासपूरक राष्ट्रीय छात्र सेना, स्पर्धा परीक्षा क्रीडा नेमबाजी या सर्व प्रकारांत मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे.
त्याचा हा परिणाम आहे. या यशाबद्दल गोयल यांनी प्राचार्य संजय चाकणे व राजेंद्र लेले यांचा सत्कार केला. संस्थेने विषेशत: पायाभूत सुविधामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केले आहे, याकडे प्राचार्यांनी लक्ष वेधले. त्यांनी महाविद्यालयाने केलेले संशोधन लिखाण, क्रीडा क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंद छाजेड, सहसचिव सुरजभान अगरवाल ,संचालक रमेश अवस्थी, भुतडा, पंगुडवाले, अजय सूर्यवंशी, मुरकुटे, काशिनाथ देवधर आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. अर्जुन मुसमाडे यांनी आभार मानले.





