‘या’ टिक-टॉक’ स्टारला झाली करोनाची लागण
मास्कची खिल्ली उडवने पडले महागात

संपूर्ण जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. कारण जगात कोरोनाचे जवळपास 17 लाख 80 हजार रुग्ण झाले आहेत. जगभरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 1 लाख 8 हजारांवर (10771) गेली आहे. तर चार लाख 3 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर भारतात कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण पाहता, सर्व राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आलं आहे. तसेच सरकारनं सर्वांना घरी राहून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

अशात बॉलीवूड सेलेब्स सुद्धा सोबतच ‘टिक-टॉक’ स्टार सुद्धा त्यांचा लॉकडाउन दरम्यान बाबत सोशल मीडियावर प्रत्येक दिवसांचे अपडेट देत आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशचा ‘टिक-टॉक’ स्टार समीर खानला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी समीरने त्याच्या टिकटॉक व्हिडीओमध्ये मास्कची खिल्ली उडवली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता करोनाची लागण झाल्यानंतर समीरने त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना केली आहे. समीर मध्यप्रदेशच्या एका छोट्या जिल्ह्यातील राहणारा असून त्याठिकाणी करोनाची लागण झालेला हा पहिलाच व्यक्ती आहे. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.





