‘बागी 3’ मध्ये दिसणार टायगरचा पॉवरफुल अॅक्शन अवतार
Updated On:

मुंबई – ‘बागी’ आणि ‘बागी 2’ चित्रपटातून धमाकेदार अॅक्शन सिन करत झळकलेला बॉलिवूडचा शेअर म्हणजेच अभिनेता ‘टायगर श्रॉफ’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस उतरला आहे. बागी फ्रांचायजीतील ‘बागी 3’ चित्रपटाचा आज (दि. 6) ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात टायगरचा पुन्हा एकदा जबरदस्त अॅक्शन अवतार अवतारात दिसला.
दरम्यान, ‘बागी 3’ मध्ये टायगर श्रॉफसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच, यापूर्वी ‘बागी 2’ चित्रपटात तो अभिनेत्री दिशा पाटनीसोबत दिसला होता. ‘बागी 3’ चित्रपटात अभिनेता रितेश देखमुख आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे सुद्धा मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहे.





