Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफचे कमबॅक; नवीन गाणं रिलीज
Tiger Shroff : गोळीबाराच्या घटनेनंतर एका महिन्याने अभिनेत्याने सोशल मीडियावर पुनरागमन केले

Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने (Tiger Shroff) गोळीबारच्या घटनेनंतर कमबॅक केले आहे. त्याचं नवीन गाणं रिलीज झाले आहे. ‘तेनु लेके जाना’ असं या गाण्याचं नाव आहे. टायगर श्रॉफने हे गाणे री आलिया आणि श्रेया जैन यांच्यासोबत मिळून गायले आहे. द रिशने या गाण्याचे बोल लिहिले असून या गाण्याची निर्मातीही तिनेच केली आहे.
टायगर श्रॉफने आपल्या नवीन गाण्याचा टीझर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, ‘एक और चांस, एक और डांस.’ अभिनेत्याच्या या संदेशाला त्याचे पुनरागमन मानले जात आहे. व्हिडिओमध्ये तो काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसतो. त्याचे दमदार डान्स मूव्ह्ज आणि बॉडी या टीझरचे खास आकर्षण ठरत आहे. या गाण्यात टायगर अभिनेत्री केतिका शर्मासोबत रोमान्स करताना दिसत आहे. (Tiger Shroff)
View this post on Instagram
हे गाणं २००९ मध्ये आलेल्या ‘जय वीरू’ चित्रपटातील ‘तेनु ले’ या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन आहे. मूळ गाण्याला ओमर इनायत यांनी आपला आवाज दिला होता. त्यात कुणाल खेमू आणि अंजना सुखानी दिसले होते. आता नवीन व्हर्जनमध्ये टायगर आणि केतिका शर्मा यांची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल. (Tiger Shroff)
टायगर पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात परतला आहे. मुंबईत झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सुमारे एका महिन्याने अभिनेत्याने सोशल मीडियावर पुनरागमन केले आहे. सोमवारी त्याने आपल्या आगामी ‘तेनु लेके जाना’ या गाण्याचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतरची ही त्याची पहिलीच सोशल मीडिया पोस्ट होता. टायगरच्या पुनरागमनामुळे त्याचे चाहतेही आनंद व्यक्त करत आहे. (Tiger Shroff)
हेही वाचा :
Alia Bhatt : आलिया भट्टचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! ‘TIME 100 Next India’च्या मुखपृष्ठावर झळकली





