Alia Bhatt : आलिया भट्टचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! ‘TIME 100 Next India’च्या मुखपृष्ठावर झळकली
Alia Bhatt : ‘TIME 100 Next India’च्या मुखपृष्ठावर आलिया भट्ट झळकल्याने तिच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. प्रतिष्ठित ‘टाइम’ मासिकाच्या ‘TIME 100 Next India’ या विशेष यादीच्या मुखपृष्ठावर आलिया भट्टला स्थान मिळाले आहे. तिच्या या यशामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, मनोरंजनविश्वातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
‘TIME 100 Next India’च्या मुखपृष्ठावर आलिया भट्ट झळकल्याने तिच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या विशेष यादीत अभिनेता वेदांग रैना, पार्वती थिरुवोथू, आर्यन खान, फहीम अब्दुल्ला, संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन, क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आणि कनी कुसरुती यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांचाही समावेश आहे.
आलिया भट्टला मिळालेली ही आंतरराष्ट्रीय ओळख तिच्या अभिनय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. तिच्या अभिनयासोबतच भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाची जागतिक स्तरावर दखल घेतली जात असल्याने चाहत्यांकडून तिचे अभिनंदन केले जात आहे. सोशल मीडियावरही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, आलियाला मिळालेल्या या सन्मानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी तिच्यासोबत ‘आरआरआर’ चित्रपटात काम करतानाचा अनुभव शेअर केला. यावेळी त्यांनी आलियाच्या मेहनतीचे आणि अभिनयाप्रती असलेल्या समर्पणाचे विशेष कौतुक केले.
“आलियासाठी कोणतीही भूमिका लहान नसते,” अशा शब्दांत त्यांनी तिचे कौतुक केले. राजमौली यांनी दिग्दर्शिक केलेल्या आरआर चित्रपटात आलियाने सीता ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या वाट्याला आलेली ही भूमिका खूप छोटी होती.







