टायगर श्रॉफने अनोख्या अंदाजात दिला संदेश; I LOVE YOU म्हणत शेअर केली पोस्ट

Tiger Shroff Video | बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ अभिनयासह त्याच्या फिटनेसमुळे चांगलाच चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या आधी त्याने प्रेम व्यक्त करणारे एक पोस्ट केली आहे.
या व्हिडीओमध्ये टायगर त्याच्या ट्रेनरसोबत स्टंट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, टायगरने जीन्ससह स्लीव्हलेस हूडी घातली आहे. तसेच त्याने मास्कच्या आधारे त्याचा चेहराही कव्हर केला आहे. व्हिडीओमध्ये त्याचा ट्रेनर सिगारेट ओढताना दिसतो, तेव्हा समोरून टायगर येतो आणि तो पायाने स्टंट करत ती सिगारेट खाली पाडतो.
यादरम्यान तो हाताने नाही म्हणत ही सवय चांगली नसल्याचा इशारा देतो. एकंदरीतच टायगरने सिगारेट ओढणं आरोग्यासाठी हानिकारक असून ती न ओढण्याचा आणि आपलं आरोग्य फिट ठेवण्याचा संदेश याद्वारे त्याने दिला आहे.
या व्हिडिओला टायगरने ‘बॉडीगार्ड’ चित्रपटातील ‘आय लव्ह यू’ हे गाणे जोडले आहे. तसेच “फक्त याच कारण मी तुझ्यावर प्रेम करतो नदीम’ असं त्याने कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांनी व्हिडीओवर लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
टायगर श्रॉफच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तो ‘बागी 4’ च्या फ्रँचायझीमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, सोनम बाजवा आणि हरनाज संधू यांच्यासह अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. ए. हर्ष यांनी ‘बागी 4’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून 5 सप्टेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल; भेटीमागचं कारण अस्पष्ट





