टायगर श्रॉफने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले खास सरप्राइज, नवीन चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर केले शेअर

Baaghi 4 Poster | बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा आज 35वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्ताने अभिनेत्याने चाहत्यांना खास सरप्राइज दिले आहे. टायगर श्रॉफने वाढदिवसानिमित्त त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बागी 4’ चे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता अॅक्शन आणि थ्रिलर लूकमध्ये दिसत आहे.
‘बागी’ चित्रपटाच्या माध्यमातूनच टायगरला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपट फ्रेंचाइजीला प्रेक्षकांचाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. याआधी रिलीज झालेल्या फ्रेंचाइजीमधील तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता ‘बागी 4’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टायगर श्रॉफने वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. नवीन पोस्टर शेअर करत टायगर श्रॉफने लिहिले की, ज्या फ्रेंचाइजीने मला ओळख दिली व अॅक्शन हीरो म्हणून मला सिद्ध करण्याची संधी दिली.. आता ही फ्रेंचाइजी माझी ओळख बदलत आहे. यावेळी नक्कीच आधीसारखे नसेल, पण मला आशा आहे की तुम्ही लोकं 8 वर्षांपूर्वी केले होते, त्याचप्रमाणे यावेळीही मला स्विकाराल.’
View this post on Instagram
अभिनेत्याने नवीन पोस्टरसोबत चित्रपटाची रिलीज डेट देखील शेअर केली आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होईल. या चित्रपटात टायगरसोबत हरनाज कौर संधू देखील झळकणार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन ए हर्षा यांनी केले आहे.
दरम्यान, या फ्रेंचाइजमधील पहिला चित्रपट ‘बागी’ 2016 साली रिलीज झाला होता. त्यानंतर 2018 मध्ये ‘बागी 2’ आणि 2020 मध्ये ‘बागी 3’ प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.





