जॅकी श्रॉफला टायगरने मारली घट्ट मिठी, बाप-लेकाचा व्हिडिओचे होतेय कौतूक

अभिनेता जॅकी श्रॉफ सगळ्यांना खूप प्रेमाने भेटतो. सामान्य असो वा खास, तो बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असल्याची जाणीव कधीच समोरच्या व्यक्तीला करून देत नाही. आणि घरीही तो तसाच असतो. नुकताच जॅकी श्रॉफने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
जॅकी श्रॉफने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो त्याचा मुलगा टायगर श्रॉफसोबत दिसत आहे. वडील आणि मुलाचे हे प्रेमळ नाते सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही सोफ्यावर झोपून एकमेकांना मिठी मारत आहेत. जॅकीच्या पोटावर टायगर पडलेला आहे. जणू काही बाप लहान मुलाला थोपटत आहे. त्यांच्यातील प्रेमळपणा दिसून येत आहे.
ही क्लिप शेअर करताना जॅकी श्रॉफने लिहिले की, ‘देव सर्व मुलांना आशीर्वाद द्या…’ या क्लिपवर सोनू निगम, सुनील ग्रोव्हर, सुनील शेट्टी, आयुष्मान खुराना, अर्जन बाजवा, राहुल देव, श्रुती उल्फत, रिचा चढ्ढा, संगीता बिजलानी, कृष्णा अभिषेक, हर्षदीप कौर आणि इतर कलाकारांनी हार्ट इमोजीसह आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
1 नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ दिसणार आहेत. जिथे जग्गू दादा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर टायगर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. यासोबतच ‘भूल भुलैया 3’ देखील रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या दोघांमध्ये जबरदस्त टक्कर होणार आहे.
==============





