विरार : उच्चभ्रू सोसायटीच्या इमारतीवरून नवजात बालिकेला फेकले; उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू
Updated On:

विरार – विरार मध्ये एका उच्चभ्रू सोसायटीच्या इमारतीवरून नवजात बालिकेला खाली फेकून दिल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या बाळाला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे येथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हा प्रकार विरारमधील पश्चिमेच्या यशवंत नगर परिसरातील ट्युलिप सोसायटीत घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित नवजात बाळ नेमके कोणी फेकले आणि इमारतीच्या कितव्या मजल्यावरून फेकले याबाबत कोणालाच काही माहीत नव्हते. तसेच स्थानिकांनी कधीही या बाळाला ट्युलिप सोसायटीत पाहिले नव्हते. त्यामुळे हे बाळ नक्की कोणाचं आहे, हेही अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.



