अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाचे तीन वरिष्ठ अधिकारी अडचणीत; डीजीसीने दिले महत्त्वाचे आदेश

Ahmedabad Plane Crash | अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान वाहतूक सुरक्षेबाबत कारवाई सुरू केली आहे. डीजीसीएने एअर इंडियाला विभागीय उपाध्यक्षांसह त्यांच्या तीन अधिकाऱ्यांना क्रू शेड्यूलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित सर्व भूमिका आणि जबाबदाऱ्यांमधून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
डीजीसीएने २० जून रोजीच्या आपल्या आदेशात एअर इंडियाला या अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यास सांगितले. यात तीन अधिकाऱ्यांमध्ये एअरलाइनच्या विभागीय उपाध्यक्षांचाही समावेश आहे. यापूर्वी, डीजीसीएने एअर इंडियाला आपत्कालीन उपकरणे तपासण्याची नियोजित तारीख संपली असताना तीन एअरबस विमाने उडवताना सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल इशारा दिला होता. Ahmedabad Plane Crash |
या समस्येचे निराकरण करण्यात संथ गतीने काम केल्याबद्दलही डीजीसीएने फटकारले होते. हे प्रकरण मे महिन्यात एअर इंडियाच्या तीन एअरबस विमानांच्या तपासणीशी संबंधित आहे. डीजीसीएच्या अहवालानुसार, स्पॉट चेकमध्ये असे आढळून आले की, एस्केप स्लाईडवरील महत्त्वाची आपत्कालीन उपकरणे अनिवार्य तपासणी वेळ उलटूनही चालविली गेली होती. Ahmedabad Plane Crash |
एअरबस ए३२० जेटची तपासणी एका महिन्यापेक्षा जास्त उशिराने झाली होती आणि अखेर १५ मे रोजी ती पूर्ण करण्यात आली. एअरनॅव्हच्या रडार डेटावरून असे दिसून आले की, विलंबाच्या काळात या विमानाने दुबई, रियाध आणि जेद्दाहसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी उड्डाण केले होते.
दरम्यान, अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान टेकऑफनंतर काही वेळातच बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर आदळले. या अपघातात विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. तर फक्त एकच जण वाचला. तर त्या वसतिगृहातील किमान २९ जणांचा मृत्यू झाला.
मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए जुळणी सुरू आहे. आतापर्यंत २२० नमुन्यांपैकी २०२ मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यात १६० भारतीय, ७ पोर्तुगीज, ३४ ब्रिटिश आणि १ कॅनेडियन नागरिकाचा समावेश आहे.
हेही वाचा :
घरफोडीच्या तपासात आंतरराज्यीय गुन्हेगारांस अटक; ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत




