Accident News : प्रसिद्ध गायक गणेश शिंदेंसह तिघांचा भीषण अपघात; कुणाच्या छातीला दुखापत, तर कुणाच्या पायाला, नेमकं काय घडलं?
Accident News : त्यांची व्याख्याने मानवी नातेसंबंध, जीवन जगण्याची कला, आणि संत साहित्यावर आधारित असतात. त्यांच्या व्याख्यानांमधील सुविचार आणि गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात.

Accident News : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच वेळी 3 प्रसिद्ध गायकांचा भीषण अपघात झाला आहे. तिघंही जण कार्यक्रम आटोपून घरी कारने परतत असताना अपघाताची घटना घडली.
सुप्रसिद्ध गायक गणेश शिंदे, गायिका सन्मिता शिंदे आणि प्रतीक्षा असे अपघात झालेल्यांची नावे आहेत. ते प्रामुख्याने ‘मोगरा फुलला’, ‘ज्ञानियांचा राजा’ यांसारख्या संगीतमय कार्यक्रमांसाठी ओळखले जातात.
त्यांची व्याख्याने मानवी नातेसंबंध, जीवन जगण्याची कला, आणि संत साहित्यावर आधारित असतात. त्यांच्या व्याख्यानांमधील सुविचार आणि गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात.
या अपघाताची माहिती गणेश शिंदे या गायकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली आहे.
या तिन्ही गायकांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अपघाताची घटना घडल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्याविषयी चाहते चिंता व्यक्त करत आहे. मात्र, तिघांवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून ते आता सुखरुप आहेत.
नेमकं काय घडलं?
सुप्रसिद्ध गायक गणेश शिंदे , गायिका सन्मिता शिंदे आणि प्रतीक्षा हे तिघे ‘मोगरा फुलला’ हा कार्यक्रम आटपून घरी जाते होते. त्यावेळी कारचा अपघात झाला. सुदैवाने एअरबॅग्स ओपन झाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, गायकाच्या छातीला गंभीर दुखापत झाली आहे. तर सन्मिता आणि गायिका प्रतिक्षा यांच्या पायाला दुखापत झाली आहे. दोन्ही गायिकांचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले.
View this post on Instagram
गणेश शिंदे यांची सोशल मीडिया पोस्ट
“कानावरून गेल..
‘मोगरा फुलला’ कार्यक्रम आटपून घरी परतत असताना आमच्या गाडीला भीषण अपघात झाला. क्षणार्धात एअरबॅग्स ओपन झाल्याने मोठा अनर्थ टळला. मला एअरबॅग्स मुळे छातीला दुखापत झाली असली तरी ती ऑपरेशनशिवाय बरी होण्यासारखी आहे. सन्मिता आणि गायिका प्रतिक्षा यांच्या पायाला दुखापत झाली. मित्रपरिवार, ॲम्ब्युलन्स सेवा आणि माऊली हॉस्पिटल तसेच संचेती हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी तातडीने मदत केल्यामुळे सर्व उपचार वेळेत सुरू झाले. प्रतिक्षाचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले असून सन्मिताचेही ऑपरेशन आता व्यवस्थित पार पडेल. ओटीमध्ये जाताना तिला ज्ञानोबरायांचा फोटो दाखवला मोबाईलमध्ये. म्हटले तू आत्ता बरी होशील आणि माऊली समोर अभंग म्हणशील. इवलेसे रोप लावियेले द्वारी…
या संपूर्ण प्रसंगात अनेक प्रश्न मनात येतात, पण शेवटी जाणवत… अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. पुढे अधिक काळजी घ्यायची आणि बाकी सर्व माउलींच्या चरणी स्वाधीन करायचे…
आपल्या सर्व रसिकश्रोत्यांचे, मित्रपरिवाराचे, शुभेच्छा व आशीर्वाद आहेतच. अनेक मित्रांनी मान्यवरांनी मनापासून सहकार्य केले व तातडीने मदत उपलब्ध झाली आभारी आहोत. ज्ञानोबारायांची कृपा आणि आपला आशीर्वाद कायम सोबत राहो.
तुकोबारायांच्या शब्दांत एवढंच –
“कृपाळू सज्जन,तुम्ही संतजन
परी पायावेगळा करू नका…”
हेही वाचा : Aishwarya Rai Bachchan : पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ऐश्वर्याचा जलवा; ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर नवा अंदाज





